महाराष्ट्रात कांदा अर्ली-खरीप, खरीप, लेट-खरीप आणि रब्बी या चार हंगामात घेतला जातो. अर्ली-खरीप कांद्याची काढणी ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान केली जाते ज्याची लागवड एप्रिल-मे मध्ये करण्यात येते.
राज्यात खरीप कांद्याची रोपण जुलै-ऑगस्ट दरम्यान होते व काढणी ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान केली जाते. लेट-खरीप कांद्याची काढणी जानेवारी ते मार्च दरम्यान होते ज्याची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान केली जाते.
राज्यातील शेतकरी डिसेंबरमध्ये रब्बी कांद्याची लागवड सुरू करतात व ती जानेवारी अखेर पर्यंत चालते. लावलेल्या रब्बी कांद्याची काढणी मार्चच्या अखेरीस सुरू होते आणि मे अखेरपर्यंत चालू राहते.
राज्यात रब्बी हंगामात एकूण कांद्याच्या सुमारे ५०-६० टक्के उत्पादन होते, त्यानंतर लेट-खरीप कांद्याचे ३०-४० टक्के, खरीप कांद्याचे ८-९ टक्के व अर्ली-खरीप कांद्याचे १-२ टक्के उत्पादन होते.
महाराष्ट्रातील कांद्याची पेरणी, पुनर्लावणी आणि काढणीची वेळ
हंगाम | पेरणीची वेळ | पुनर्लावणीची वेळ | काढणीची वेळ |
अर्ली-खरीप | फेब्रुवारी-मार्च | एप्रिल-मे | ऑगस्ट-सप्टेंबर |
खरीप | मे-जून | जुलै-ऑगस्ट | ऑक्टोबर-डिसेंबर |
लेट-खरीप | ऑगस्ट-सप्टेंबर | ऑक्टोबर-नोव्हेंबर | जानेवारी-मार्च |
रब्बी | ऑक्टोबर-नोव्हेंबर | डिसेंबर-जानेवारी | एप्रिल-मे |
अधिक वाचा: Us Lagwad : पूर्वहंगामी उसाची लागवड करताय उत्पादन वाढीसाठी असे करा नियोजन