Lokmat Agro >स्मार्ट शेती > Kanda Pil Rog : कांदा पिकावरील पिळ रोगाच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

Kanda Pil Rog : कांदा पिकावरील पिळ रोगाच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

Kanda Pil Rog : Follow this simple remedy to control the twister disease in onion crop | Kanda Pil Rog : कांदा पिकावरील पिळ रोगाच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

Kanda Pil Rog : कांदा पिकावरील पिळ रोगाच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

सध्या आपणाला सगळीकडे कांदा पिकावर पीळ पडणे ह्या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. शेतकरी ह्या रोगाने त्रस्त झाले आहेत.

सध्या आपणाला सगळीकडे कांदा पिकावर पीळ पडणे ह्या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. शेतकरी ह्या रोगाने त्रस्त झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या आपणाला सगळीकडे कांदा पिकावर पीळ पडणे ह्या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. शेतकरी ह्या रोगाने त्रस्त झाले आहेत. तर नक्की ह्या रोगामागील कारणे? कसा पसरतो? लक्षणे काय आहेत? कुठे आढळतो? नियंत्रण कसे करावे? हे आपण बघूया.

रोगाची कारणे
१) पिकाच्या अवशेषांमधून आणि नंतर रोपाद्वारे किंवा कांद्याद्वारे पसरतो.
२) कांद्याचे अशुद्ध बियाणे.
३) अशुद्ध बियाण्यामुळं रोपांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन कांदा रोगाला बळी पडताना दिसत आहे.

रोग कुठे आढळतो?
१) कालांतराने काळी बुरशी वाढल्याने ती कंदापर्यंत पोहोचते.
२) सुरुवातीला हा प्रकार पाणी साचलेल्या ठिकाणी जास्त दिसून येतो.
३) परिणामी कांदा पोसत नाही आणि कांदा काढणीपर्यंत पीक सडू लागते.

रोगाची लक्षणे
१) पातीवर सुरुवातीपासून पांढरे ठिपके दिसू लागतात व नंतर ते पिवळ्या रंगात रूपांतर होऊन सर्व पातीवर पसरतात.
२) रोगाची तीव्रता वाढल्यास कांद्याची मान लांब होण्यास सुरुवात होते.
३) पुढील काळात कांद्याची मान वाकून जमिनीवर पसरू लागते.

रोग कशामुळे पसरतो?
१) अँथ्रोक्नोज ह्या बुरशीमुळे हा रोग कांदा पिकास होतो.
२) सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात वाढणारी आर्द्रता.

नियंत्रण कसे करावे?
१) पिकाची फेरपालट करावी.
२) जुन्या पिकाचे अवशेष वेचून बाहेर काढावेत.
३) रोपवाटिका गादी वाफ्यावर करावी.
४) बीजप्रक्रिया करताना कार्बेन्डझिम या बुरशीनाशकचा वापर करावा.
५) रोपप्रक्रिया करताना कार्बेन्डझिम या बुरशीनाशकात रोपाच्या मुळ्या १० ते १५ मिनीटे बुडवून पुर्नलागवड करावी.
६) जैविक नियंत्रणामध्ये बियाणे टाकल्यानंतर ४ ते ६ दिवसांनी ट्रायकोडर्माची एक किलो/एकर प्रमाण घेऊन आळवणी द्यावी. पुनर्लागवड असेल तरी हेच प्रमाण पाटपाणी, ड्रीप किंवा तुषार सिंचन असेल तर त्याद्वारे सिंचनातून द्यावे.
७) बियाणे टाकल्यावर किंवा पुनर्लागवडीनंतर ठीक १५ दिवसांनी मँकोझेब दीड ग्राम प्रति लिटरने फवारणी द्यावी.
८) दर १० दिवसांनी आलटून पालटून बुरशीनाशकाच्या फवारणी कराव्यात.

अधिक वाचा: कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंडीवर मेटॅऱ्हाझीयम व ट्रायकोडर्मा बुरशी कशी वाढवावी

Web Title: Kanda Pil Rog : Follow this simple remedy to control the twister disease in onion crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.