Lokmat Agro >स्मार्ट शेती > Karala Lagavd : कारळा पिकाची सुधारित वाणाने कशी कराल पेरणी?

Karala Lagavd : कारळा पिकाची सुधारित वाणाने कशी कराल पेरणी?

Karala Lagavd : How to sow niger karala crop with improved variety? | Karala Lagavd : कारळा पिकाची सुधारित वाणाने कशी कराल पेरणी?

Karala Lagavd : कारळा पिकाची सुधारित वाणाने कशी कराल पेरणी?

कारळा हे पीक दुर्गम आदिवासी भागातच जोपासले गेले असल्याने या भागातील शेतकरी यापासून मिळणाऱ्या तेलाचा वापर त्यांच्या दैनंदिन आहारात तसेच जखमेवर घाव भरून येण्यासाठी करतात. 

कारळा हे पीक दुर्गम आदिवासी भागातच जोपासले गेले असल्याने या भागातील शेतकरी यापासून मिळणाऱ्या तेलाचा वापर त्यांच्या दैनंदिन आहारात तसेच जखमेवर घाव भरून येण्यासाठी करतात. 

शेअर :

Join us
Join usNext

सुंदर पिवळी फुले असणारे खुरासणी हे आपत्कालिन परिस्थितीत तग धरणारे एक महत्वाचे तेलबिया पीक असून महाराष्ट्रात या पिकाला कारळा असेही संबोधले जाते.

या पिकाच्या बियांमध्ये ३५ ते ४०% तेलाचे तर १८ ते २०% प्रोटीनचे प्रमाण आढळते. बियापासून मिळणारे तेल आरोग्यवर्धक, पौष्टिक, औषधी असून या पासून मिळणाऱ्या तेलाला डोंगराळ भागातील लोकांचे तूप म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

हे पीक दुर्गम आदिवासी भागातच जोपासले गेले असल्याने या भागातील शेतकरी यापासून मिळणाऱ्या तेलाचा वापर त्यांच्या दैनंदिन आहारात तसेच जखमेवर घाव भरून येण्यासाठी करतात. 

सुधारित वाण
१) फुले कारळा (आय. जी. पी. एन. २००४-१)

खोडाचा रंग अति जांभळा, फुलाचा रंग नारंगी, पानचा रंग अति हिरवा आणि तेलाचे प्रमाण ३९-४०%
२) फुले वैतरणा (आय. जी. पी. एन. ८००४)
खोडाचा रंग जांभळा, फुलाचा रंग नारंगी, पानचा रंग हिरवा आणि तेलाचे प्रमाण ३९-४०%

बिजप्रकिया
पेरणीपूर्वी कार्बेन्डॅझिम हे बुरशीनाशक २.५ ग्रॅ./कि. या प्रमाणात किंवा थायरम ३.० ग्रॅम प्रति किलो बियाणे बियाण्यास चोळावे. अॅझोटोबॅक्टर/अॅझोस्पिरीलम हे जीवाणूसंवर्धक २५ ग्रॅ. प्रति कि. बियाणास चोळावे आणि त्यानंतर २५ ग्रॅ. स्फुरद विरघळणारे जिवाणू प्रति किलो बियाण्यास चोळावे.

बियाणे मात्रा आणि पेरणी पध्दत
-
हेक्टरी ४-५ किलो बियाणे पुरेसे होते. शेतकरी खुरासणीची पेरणी बी फोकुन करतात. मात्र अधिक उत्पादनासाठी ३० x १० सें.मी. अंतरावर ओळीने पेरणी करावी.
- पेरणी करताना खुरासणीचे बी वाळू, बारीक मऊ शेणखत अथवा राखेमध्ये (१:२०) मिसळून २ ते ३ सें. मी. खोलीवर पेरावे.
- पेरणी झाल्यानंतर ते त्वरित मातीने झाकून घ्यावे.
- पेरणी करताना दोन ओळींमध्ये आणि दोन रोपांमध्ये अंतर ठेवल्यास रोपांची चांगली वाढ होते.
- योग्य अंतरावर खुरासणी पिकाची पेरणी, निंदनी आणि खते दिल्याने रोपांची व फांद्यांची वाढ होण्यास मदत होते.
- म्हणून अधिक उत्पादनासाठी ३० x १० सें. मी. अंतरावर ओळीने पेरणी करावी आणि शिफारशीप्रमाणे आंतरमशागत करावी व खते द्यावीत.

Web Title: Karala Lagavd : How to sow niger karala crop with improved variety?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.