करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. रब्बी हंगामात पाण्याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते. कारण या पिकाच्या मुळ्या जमिनीत १४० ते १५० सेंमी खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात.
करडई भीमा (महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित वाण) फुले कुसमा, एस.एस.एफ. ६५८, ७०८, फुले नीरा, फुले भिवरा, फुले गोल्ड, फुले किरण, फुले भूमी, पी.बी.एन.एस. १८४, ए.के.एस. २०७, आय.एस.एफ. ७६४, जे.एस.आय. ९७ हे अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारशीत सुधारित वाण आहेत.
तसेच पी.बी.एन.एच. ८६ (पूर्णा) हे मराठवाड्यासाठी शिफारशीत वाण आहे. त्याचप्रमाणे डी.एस.एच. १८५ हे संकरित वाण अधिक उत्पादनक्षम असून, लागवडीसाठी उपयुक्त आहे.
१) भीमाकालावधी (दिवस) - १२०-१३०उत्पादन (क्विं/हे.) - १२-१४विशेष गुणधर्म - अवर्षणास प्रतिकारक, मावा किडीस व पानावरील ठिपके रोगास मध्यम प्रतिकारक. महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी प्रसारित.
२) फुले कुसुमाकालावधी (दिवस) - १२५-१४०उत्पादन (क्विं/हे.) - जिरायती १२-१५ | बागायती २०-२२विशेष गुणधर्म - संरक्षित पाण्याच्या ठिकाणी व बागायती लागवडीस योग्य, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस.
३) एस.एस.एफ. ६५८कालावधी (दिवस) - ११५-१२०उत्पादन (क्विं/हे.) - १२-१३विशेष गुणधर्म - बिगर काटेरी, फुलांच्या पाकळ्यासाठी योग्य, अखिल भारतीय स्तरावरलागवडीसाठी शिफारस.
४) एस.एस.एफ. ७०८कालावधी (दिवस) - ११५-१२०उत्पादन (क्विं/हे.) - जिरायती १३-१६ | बागायती २०-२५विशेष गुणधर्म - महाराष्ट्रात जिरायती आणि बागायती लागवडीसाठी शिफारस. मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
५) एस.एस.एफ. १२-४० (फुले नीरा)कालावधी (दिवस) - १२०-१२५उत्पादन (क्विं/हे.) - जिरायती १२-१५ | बागायती २०-२२विशेष गुणधर्म - अधिक तेलाचे प्रमाण ३२.९%. मावा किडीस मध्यम प्रतिकारक, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस.
६) एस.एस.एफ.१३-७१ (फुले भिवरा)कालावधी (दिवस) - १२०-१३०उत्पादन (क्विं/हे.) - जिरायती १३-१६ | बागायती २०-२५विशेष गुणधर्म - अधिक उत्पादन, मावा किडीस मध्यम प्रतिकारक, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस.
७) एस.एस.एफ. १५-६५ (फुले गोल्ड)कालावधी (दिवस) - १२०-१३०उत्पादन (क्विं/हे.) - जिरायती १२-१५ | बागायती २०-२२विशेष गुणधर्म - अधिक उत्पादन, अधिक तेलाचे प्रमाण ३४.६%. मावा किडीस मध्यम प्रतिकारक, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस.
८) एस.एस.एफ.१६-०२ (फुले किरण)कालावधी (दिवस) - १२०-१३०उत्पादन (क्विं/हे.) - जिरायती १३-१६ | बागायती २०-२५विशेष गुणधर्म - अधिक उत्पादन, मावा किडीस मध्यम प्रतिकारक, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस.
९) एस.एस.एफ.१८-०२ (फुले भूमी)कालावधी (दिवस) - १२०-१३०उत्पादन (क्विं/हे.) - जिरायती १३-१६ | बागायती २०-२५विशेष गुणधर्म - अधिक उत्पादन, मावा किडीस मध्यम प्रतिकारक, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस.
१०) पी.बी.एन.एस.१२कालावधी (दिवस) - १३०-१४०उत्पादन (क्विं/हे.) - जिरायती १२-१५ | बागायती २०-२५विशेष गुणधर्म - मावा किडीस मध्यम प्रतिकारक, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस.