Join us

Kardai Lagvad : करडईचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी कसे कराल लागवड व्यवस्थापन वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 11:49 AM

करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. रब्बी हंगामात पाण्याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते.

करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. रब्बी हंगामात पाण्याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते.

कारण या पिकाच्या मुळ्या जमिनीत १४० ते १५० सेंमी खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात. महाराष्ट्रात पूर्वी करडईची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जायची. परंतु हळूहळू करडईचे क्षेत्र घटत गेले.

किफायतशीर भाव न मिळणे हे त्यामागचे एक कारण आहे. गेल्या काही वर्षांत आरोग्याबद्दल जागरूकता वाढली. त्यामुळे करडई तेलाला मोठी मागणी आहे.

करडईचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी

  • अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित आणि संकरीत वाणाची निवड करावी.
  • रब्बी हंगामात जमिनीत साठवलेल्या ओलाव्यावरच करडई पीक घेतले जाते. ओलाव्याचा कार्यक्षम पुरेपूर वापर होण्याच्या दृष्टीने करडईची पेरणी निर्धारित वेळेत पूर्ण करावी.
  • पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी विरळणी करून जास्तीची रोपे काढून टाकावीत.
  • अवर्षणग्रस्त विभागात दोन ओळीनंतर एक ओळ मोकळी सोडून त्या ठिकाणी पाणी साठण्यासाठी चर काढावा.
  • अधिक फायद्यासाठी करडई जवस किंवा करडई हरभरा (१:३/१:६) अशी आंतरपिके घ्यावीत.
  • दुबार पिक पद्धतीत खरीप हंगामातील पिके कमी कालावधीची निवडावीत म्हणजे करडईची वेळेवर पेरणी होऊन ओलाव्याचा जास्तीत जास्त वापर होईल.
  • दुबार पिक पद्धतीत खरीप हंगामात पावसाला जर उशीर झाला तर खरीप पिक घेऊ नये. त्याऐवजी जमीन मोकळी ठेऊन जलसंधारण करावे.
  • खरीप पिकानंतर रब्बी हंगामात करडई पिक घेताना बियाणे दिडपट वापरावे.
  • करडई पिकास शिफारस केलेल्या रासायनिक खताबरोबरच पाच ते सहा टन हेक्टरी शेणखत/कंपोस्ट खत वापरावे.
  • खताची मात्रा माती परीक्षणानुसार युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट मार्फत द्यावी. त्यामुळे पिकास लागणाऱ्या गंधकाची मात्रा काही प्रमाणात सिंगल सुपर फॉस्फेट मार्फत पुरविली जाते. पर्यायाने गंधकाचा खर्च वाचतो.
  • शिफारशीनुसार पिकाची फेरपालट करावी.
  • पाण्याची सोय असल्यास संवेदनशील अवस्थेत गरजेनुसार संरक्षित पाणी द्यावे.
  • पिकास फुले लागण्याच्या वेळेस १००० पीपीएम सायकोसिलची फवारणी केली असता उत्पादनात वाढ होते.
  • पारंपारीक गहू, हरभरा, जवस पिकाऐवजी सलग करडईची लागवड करावी.
  • पारंपारीक रब्बी पिकापेक्षा करडई पिक अधिक फायदेशीर होण्यासाठी फुलाच्या पाकळ्या गोळा कराव्यात.
  • खरीप पिकाच्या काढणीनंतर जमिनीतील ओलावा कमी होऊ नये म्हणून व चांगली उगवण होण्यासाठी शून्य मशागतीवर पेरणी करावी.

अधिक वाचा: डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते फळांचे अधिक उत्पादन वाचा सविस्तर

टॅग्स :करडईपेरणीलागवड, मशागतशेतकरीशेतीरब्बीपीक