Lokmat Agro >स्मार्ट शेती > Kardai Perani : करडईची पेरणी करण्याचं नियोजन करताय मग कोणती पीक पद्धती वापराल वाचा सविस्तर

Kardai Perani : करडईची पेरणी करण्याचं नियोजन करताय मग कोणती पीक पद्धती वापराल वाचा सविस्तर

Kardai Perani : Which cropping method should be adopted while planning to sowing safflower read in detail | Kardai Perani : करडईची पेरणी करण्याचं नियोजन करताय मग कोणती पीक पद्धती वापराल वाचा सविस्तर

Kardai Perani : करडईची पेरणी करण्याचं नियोजन करताय मग कोणती पीक पद्धती वापराल वाचा सविस्तर

करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. रब्बी हंगामात पाण्याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते.

शेअर :

Join us
Join usNext

करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. रब्बी हंगामात पाण्याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते.

कारण या पिकाच्या मुळ्या जमिनीत १४० ते १५० सेंमी खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात. करडई पिकाची लागवड करत असताना लागवडीच्या पीक पद्धतींचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते. 

करडई लागवडीच्या विविध पीक पद्धती
१) सलग पीक पद्धत

- काही भागात करडईची पेरणी ज्वारी पिकात पट्टे टाकून केली जाते. करडई व ज्वारी पिकाची पाण्याची गरज वेगवेगळी आहे.
- करडई पिकास वाढीच्या अवस्थेत पाणी जास्त लागते तर ज्वारी पिकास वाढीच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याची गरज असते.
- पट्टा पेर पद्धतीत सुरवातीच्या काळात करडई पीक जमिनीतील ओलाव्याचा मोठ्या प्रमाणात वापर करते.
- त्यामुळे ज्वारीच्या फुलोऱ्याच्या अवस्थेत ओलावा कमी मिळतो आणि करडईच्या शेजारील ज्वारीच्या ओळीची वाढ कमी होते.
- पर्यायाने उत्पादनात घट येते. म्हणून करडईचे सलग पीक घ्यावे तसेच काढणीसाठी मजूर मिळत नाहीत म्हणून मशीनने काढणी करण्यासाठी सलग करडई पीक घ्यावे.

२) वार्षिक फेरपालट
रब्बी हंगामात करडई, ज्वारी, हरभरा अशी वार्षिक पिकपद्धती घेतल्यास चांगले उत्पादन मिळते. तसेच रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. जमिनीचा पोत टिकून राहतो.

३) खरीप रब्बी पीक पद्धत
खरीप हंगामात वेळेवर पाऊस पडल्यास भारी जमिनीत कमी कालावधीचे मूग किंवा उडीद हे कडधान्याचे पीक घेऊन रब्बी हंगामात करडई हे पीक घ्यावे.

४) आंतरपीक पद्धती
- आंतरपीक पद्धतीमध्ये एका पिकाचे नुकसान झाले तरी दुसऱ्या पिकापासून काहीतरी उत्पादन मिळते. म्हणून सलग पीक लागवडीपेक्षा आंतरपीक फायदेशीर आहे.
- रब्बी हंगामात सहा ओळी हरभरा + तीन ओळी करडई (६:३) किंवा चार ओळी जवस + दोन ओळी करडई (४:२) ही आंतरपिक पद्धत फायदेशीर आहे.

Web Title: Kardai Perani : Which cropping method should be adopted while planning to sowing safflower read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.