पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.
सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी असेल. सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत.
मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
केळी पिकासाठी प्रती हेक्टर संरक्षित रक्कम रु. आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे
संरक्षित रक्कम रु. | शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु. | |
नियमित विमा | १,७०,०००/- | ८,५००/- |
गारपीट | ५७,०००/- | २,८५०/- |
हवामान धोका व कालावधी व प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रु.)
१) कमी तापमान (दि. १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी)
या कालावधीमध्ये सलग ३ दिवस किमान तापमान ८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु. ३२,१७९/- देय होईल.
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ३२,१७९/-)
२) वेगाचा वारा (दि. १ मार्च ते ३१ जुलै)
(दि. २२/०१/२०१६ च्या शासन परिपत्रकान्वये नुकसान ठरविण्यासाठी पंचनामा कार्यपद्धती निश्चित केले नुसार विमा भरपाई देय होईल.)
या कालावधीमध्ये ४० कि.मी.प्रति तास अथवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याची नोंद संदर्भ हवामान केंद्रावर झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासुन ७२ तासात नुकसानग्रस्त केळी पिकाची माहिती कृषि विभाग/विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे.
संबधित विमा कंपनी, महसूल, ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. फक्त संदर्भ हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्याची नोंद ही नुकसान भरपाईसाठी पात्र होणार नाही.
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ८५,०००/-)
३) जादा तापमान (दि. १ एप्रिल ते ३० एप्रिल)
या कालावधीमध्ये सलग ५ दिवस ४२ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहील्यास रक्कम रु. ४२,५००/- देय होईल.
४) दि. १ मे ते ३१ मे
या कालावधीमध्ये सलग ५ दिवस ४५ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहील्यास रु. ५२,८२१/- देय होईल.
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ५२,८२१/-)
गारपीटसाठी दि. १ जानेवारी ते २० एप्रिल
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२४
संपर्क
शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.