Lokmat Agro >स्मार्ट शेती > Kharif Intercropping खरीप हंगामात या पद्धतीने पेरणी करा मिळेल अधिकचा नफा

Kharif Intercropping खरीप हंगामात या पद्धतीने पेरणी करा मिळेल अधिकचा नफा

Kharif Intercropping; Sowing in this manner during Kharif season and you will get more profit | Kharif Intercropping खरीप हंगामात या पद्धतीने पेरणी करा मिळेल अधिकचा नफा

Kharif Intercropping खरीप हंगामात या पद्धतीने पेरणी करा मिळेल अधिकचा नफा

आंतरपीक एकमेकास स्पर्धक नसून पूरक नियोजन करावे. शिफारशीत जातीची निवड करावी. पीक पध्दतीचे नियोजन करताना गरजेनुसार पर्यायी पिकाचा समावेश करावा. जिरायती शेतीमध्ये पीक पध्दती, आंतरपीक पध्दती, दुबारपीक पध्दतीचा अवलंब करावा.

आंतरपीक एकमेकास स्पर्धक नसून पूरक नियोजन करावे. शिफारशीत जातीची निवड करावी. पीक पध्दतीचे नियोजन करताना गरजेनुसार पर्यायी पिकाचा समावेश करावा. जिरायती शेतीमध्ये पीक पध्दती, आंतरपीक पध्दती, दुबारपीक पध्दतीचा अवलंब करावा.

शेअर :

Join us
Join usNext

आंतरपीक Intercropping Method पध्दतीत एकाच शेतात, एका हंगामात दोन पीके घेण्यात येतात. त्यात एक प्रमुख पीक असते तर दुसरे दुय्यम पीक असते. पिकाची पेरणी ओळीच्या ठराविक प्रमाणात केली जाते. आंतरपीक पध्दतीच्या कालावधीमध्ये योग्य फरक असावा.

आंतरपीक एकमेकास स्पर्धक नसून पूरक नियोजन करावे. शिफारशीत जातीची निवड करावी. पीक पध्दतीचे नियोजन करताना गरजेनुसार पर्यायी पिकाचा समावेश करावा. जिरायती शेतीमध्ये पीक पध्दती, आंतरपीक पध्दती, दुबारपीक पध्दतीचा अवलंब करावा.

आंतरपीक घेण्याचे प्रमुख उद्दीष्ट्ये
१) ठराविक क्षेत्रामधून अधिक उत्पादन व जास्तीत जास्त नफा मिळविणे.
२) जमिनीच्या मुलद्रव्यांचा समतोल राखणे.
३) आंतरपीक प्रामुख्याने कडधान्य वर्गातील निवडावे.
४) पिकाचे किड व रोगापासून संरक्षण मिळणे.
५) कुटूंबाच्या मुलभूत गरजा भागविणे आणि रोजगार उपलब्ध होणे.
६) गुरांना नियमित वैरण मिळणे

आंतरपीक पध्दतीचे फायदे
१) पावसाच्या अनिश्चित वितरणामुहे मुख्य पिकाची वाढ व उत्पादन घटले तरी आंतरपिकापासून निश्चित उत्पादन मिळते.
२) आंतरपिके प्रामुख्याने कडधान्य वर्गात मोडत असल्यामूळे या पिकापासून जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम होते व सुपिकता टिकून राहते.
३) कडधान्य व तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविण्याचा हा हमखास उपाय होय यामूळे कोणत्याही पिकाखाली क्षेत्र कमी होत नाही उलट या पध्दतीने नवीन पिकाखाली अधिक क्षेत्र आणता येईल.
४) आंतरपीके पसरट व बुटकी असल्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मूरण्यास मदत होऊन जमिनीची धूप कमी होते.
५) जमिनीच्या सर्व स्तरातून अन्नद्रव्ये घेण्यास मदत होते.
६) आंतरपीक हे प्रामुख्याने कडधान्य वर्गातील असावीत.
७) दोन पिकांची मुळांची वाढ भिन्न पध्दतीने होत असल्याने जमिनीतील ओलावा पुरेपुर वापरला जातो व नैसर्गिक संपत्तीचा पुरेपुर लाभ होतो.

आंतरपीक पध्दतीमध्ये मुख्य आणि आंतरपिकाची योग्य निवड
जमीन, हवा, पाणी, प्रकाश अन्नद्रव्ये या नैसर्गीक घटकांचा समतोल आणि परिणामकारकरित्या उपयोग होण्यासाठी मूख्य आंतरपिकाची योग्य निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी खालील गोष्टी विचारात घ्याव्यात.
१) मुख्य आणि आंतरपिकाची वाढण्याची सवय भिन्न असावी. उदा. मूख्य पिकाची वाढ सरळ असल्यास आंतरपीक पसरट आणि बुटके असावे.
२) मुख्य आणि आंतरपिकाची मुळांची संरचना तंतुमय असल्यास आंतरपीक शक्यतो सोटमूळ असलेले निवडावे.
३) मुख्य आणि आंतरपिकाच्या पक्वतेच्या कालावधीत योग्य फरक असावा. ज्यामुळे दोन्ही पिकाच्या वाढीच्या असस्था भिन्न राहून उत्पादन वाढीच्या सर्व घटकाचा फायदा दोन्ही पिकास मिळतो.
४) मुख्य आणि आंतरपीक एकमेकांस स्पर्धक नसावे. उलट ते एकमेकांस पूरक असणे जरुरीचे असते.
५) आंतरपीक हे प्रामुख्याने कडधान्य वर्गातील असावीत.
६) आंतरपीकापासून जनावर वैरण, कुटुबांच्या दैनंदिन आहारातील गरजा भागविणारी पिके उदा. डाळवर्गीय पीके निवडावीत.

अधिक वाचा: White Grub Management हुमणी नियंत्रणाचे कमी खर्चातील सोपे उपाय कोणते?

Web Title: Kharif Intercropping; Sowing in this manner during Kharif season and you will get more profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.