राज्यातील एकूण ऊस क्षेत्रापैकी ३५ ते ४० टक्के खोडव्याचे क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त ३० ते ३५ टक्के इतका आहे. म्हणून ऊस पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या उसाप्रमाणेच खोडव्याचे उत्तम व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
उसाची तोडणी ऑक्टोबर पासून एप्रिल/मे पर्यंत केली जाते. या उसाचा खोडवा ठेवला जातो. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, जसजसा खोडवा राखण्यास उशीर होतो, तसतसे खोडव्याचे उत्पादन कमी होत जाते.
म्हणून १५ फेब्रुवारीनंतर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवू नये. पाडेगाव येथे झालेल्या संशोधनानुसार सप्टेंबर ते ऑक्टोंबर या कालावधीत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळते.
तसेच आडसाली, पूर्वहंगामी व सुरु या हंगामातील तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवल्यास पूर्वहंगामी उसापासून ठेवलेल्या खोडव्याचे अधिक उत्पादन मिळते.
खोडवा ठेवताना या गोष्टी करू नयेत
- पाचट जाळणे.
- रासायनिक खतांचा फोकुन वापर करणे.
- पाचट शेता बाहेर काढणे.
- बुडख्यांवर पाचट ठेवणे.
- पाण्याचा अतिवापर करणे.
- फेब्रुवारी नंतर उसाचा खोडवा राखू नये.
अधिक वाचा: साठवणुकीत कांद्याला मोड येऊ नये म्हणून करा हा सोपा उपाय? वाचा सविस्तर