Lokmat Agro >स्मार्ट शेती > मुलांनो, ई-पीक पाहणीत वडिलांना मदत करा!

मुलांनो, ई-पीक पाहणीत वडिलांना मदत करा!

kids help dad with the E-Peak pahani e crop inspection! | मुलांनो, ई-पीक पाहणीत वडिलांना मदत करा!

मुलांनो, ई-पीक पाहणीत वडिलांना मदत करा!

ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र, यासाठी पिंपळगाव बसवंत येथील तलाठी राकेश बच्छाव यांनी थेट शाळा-महाविद्यालयात जाऊन शेतकरीपुत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच वडील, भाऊ यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र, यासाठी पिंपळगाव बसवंत येथील तलाठी राकेश बच्छाव यांनी थेट शाळा-महाविद्यालयात जाऊन शेतकरीपुत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच वडील, भाऊ यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतःच्या मोबाइलवरून शेतातील विविध पिकांची आपल्या ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. यामुळे आता या ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र, यासाठी पिंपळगाव बसवंत येथील तलाठी राकेश बच्छाव यांनी थेट शाळा-महाविद्यालयात जाऊन शेतकरीपुत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच वडील, भाऊ यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरच्या आत पूर्ण करावी. कोणताही शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहू नये यासाठी पिंपळगाव मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयातर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, पिंपळगाव शहरातील शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील ई पीक पाहणी कशी करावी याचे मार्गदर्शन केले जात आहे. याबाबत तलाठी बच्छाव म्हणाले की, यावर्षी राज्य शासनाने १ रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरला. जे पीक विमा करताना नोंदवले आहे, त्या पिकाची पाहणीमध्ये नोंद होणे गरजेचे आहे.

या शाळांमध्ये केले मार्गदर्शन
ई पीक पाहणीसंदर्भात पिंपळगाव हायस्कूल, कन्या विद्यालय, जनता विद्यालय, भीमा शंकर यासह शहरातील माध्यमिक शाळेत सोसायटी, शेतकरी भवन आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणीची माहिती तहसीलदार शरद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगावचे तलाठी राकेश बच्छाव, तलाठी वृषाली नागोरे यांनी दिली.

खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करून घ्यावी व शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये पीक विमा, पीक कर्ज, शासकीय अनुदान, अतिवृष्टी अनुदान इत्यादी विविध योजना मागील वर्षाप्रमाणे १०० टक्के पूर्ण करावयाच्या आहेत. त्यासाठी पीक पाहणी शेतकयांनी करून घ्यावी. - सतीश बोडके, मंडळ अधिकारी, पिंपळगाव बसवंत

Web Title: kids help dad with the E-Peak pahani e crop inspection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.