Join us

Kokum Cultivation आरोग्यदायी 'कोकम' पिकाची लागवड कशी केली जाते?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:40 PM

कोकम हे प्रामुख्याने आढळणारे सदाहरित फळझाड आहे. या फळपिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड कशी करायची.

कोकणामध्ये  विविध प्रकारची फळझाडे आढळतात. आंबा, काजू, नारळ, सुपारी झाडांच्या कोकणात मोठ्याप्रमाणात बागा आहेत. त्यामध्ये कोकम हे प्रामुख्याने आढळणारे सदाहरित फळझाड आहे. या फळपिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड कशी करायची.

जमीन व हवामानपाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन 'कोकम' लागवडीसाठी उपयुक्त आहे. या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामान योग्य आहे.

अभिवृद्धीकोकमामध्ये रोपापासून लागवड केल्यास ५० टक्के नर व ५० टक्के मादी झाडे निघतात. खात्रीशीर मादी झाडे मिळविण्यासाठी कलम पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठाने मृदकाष्ठ पद्धत विकसित केली आहे. लागवडीत ९० टक्के मादी व १० टक्के नरांची झाडे ठेवावीत.

सुधारित जातीकोकण अमृता व कोकण हातीस या विद्यापीठाने सुधारित जाती विकसित केल्या आहेत.१) कोकण अमृता या जातीची फळे मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असून, उत्पन्न भरपूर (१४० किलो/झाड) देणारी आहेत. पावसाळ्यापूर्वी उत्पन्न मिळत असल्यामुळे फळांचे नुकसान होत नाही.२) कोकण हातीस विद्यापीठाने २००६ मध्ये ही मादी जात कोकणामध्ये लागवडीसाठी शिफारस केली आहे. या जातीची फळे मोठी, जाड सालीची व गर्द लाल रंगाची आहेत. प्रति झाडापासून १०व्या वर्षी १५० किलो फळे मिळतात.हे मादी झाड असल्यामुळे परागीकरण व फलधारणेसाठी कोकणाचे 'नर' कलम किंवा ५ ते ६ टक्के रोपे बागेत लावणे गरजेचे आहे.

लागवड- लागवडीसाठी मे महिन्यात सहा बाय सहा मीटर अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सेंटिमीटर आकाराचे खड्डे काढावेत.- पावसाळ्यापूर्वी चांगली माती, एक घमेले कुजलेले शेणखत व १.० किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत.- रोपांचे किंवा कलमांचे वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी ५० ग्रॅम फॉलीडॉल पावडर प्रत्येक खड्यात टाकावे.- पावसाच्या सुरुवातीला प्रत्येक खड्यात एक वर्षाची निरोगी, जोमदार वाढणारी दोन रोपे किंवा एक कलम लावावे.- कलमे लावल्यानंतर त्यांचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करावे.- कलमाच्या जोडाखाली खुंटापासून वारंवार येणारी फूट लगेच काढून टाकावी, अन्यथा कलम दगावण्याची शक्यता असते.- पहिल्या वर्षी कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना सावली करावी.- झाडांभोवती वाळलेले गवत वेळोवेळी काढून टाकावे.- रोपांपासून लागवड केलेल्या बागांना ६ वर्षांनी मोहर येऊन मादी झाडापासून उत्पन्न मिळू लागते.

काढणी व उत्पन्न- रोपांची लागवड केलेल्या झाडाला सहा वर्षांनंतर फळे धरू लागतात.- कलमांपासून पाचव्या वर्षांपासून फळे घ्यावीत.- ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत फुले येण्यास सुरुवात होते. मार्च ते जून महिन्यांपर्यंत फळे काढणीसाठी तयार होतात.- हिरव्या रंगाची कच्ची फळे पिकल्यानंतर लाल होतात. पूर्ण लाल झाल्यानंतर फळे काढावीत.- चांगल्या वाढलेल्या व योग्य वीण राखलेल्या झाडांपासून प्रत्येक वर्षी १०० ते १५० किलोपर्यंत फळे मिळतात.- कोकम फळाचे अधिक व लवकर उत्पादन मिळविण्यासाठी तीन टक्के पोटॅशिअम नायट्रेटच्या दोन फवारण्या कराव्यात.- पहिली फवारणी फळधारणेवेळी करावी.

अधिक वाचा: Mango Rejuvenation जुन्या आंबा बागेचं उत्पादन कसं वाढवाल, असे करा व्यवस्थापन

टॅग्स :फलोत्पादनफळेपीककोकणशेतीशेतकरी