Lokmat Agro >स्मार्ट शेती > krushi salla : पिकांच्या सरंक्षणासाठी विद्यापीठाने जारी केला कृषी सल्ला वाचा सविस्तर

krushi salla : पिकांच्या सरंक्षणासाठी विद्यापीठाने जारी केला कृषी सल्ला वाचा सविस्तर

Krushi Salla: latest news University issues agricultural advisory for crop protection Read in detail | krushi salla : पिकांच्या सरंक्षणासाठी विद्यापीठाने जारी केला कृषी सल्ला वाचा सविस्तर

krushi salla : पिकांच्या सरंक्षणासाठी विद्यापीठाने जारी केला कृषी सल्ला वाचा सविस्तर

Krushi Salla : मागील काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे फळबाग आणि उन्हाळी पिकांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. या बदलत्या हवामानात पिकांचे संरक्षण (crop protection) कसे करावे या बद्दल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे वाचा सविस्तर. (Krushi Salla)

Krushi Salla : मागील काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे फळबाग आणि उन्हाळी पिकांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. या बदलत्या हवामानात पिकांचे संरक्षण (crop protection) कसे करावे या बद्दल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे वाचा सविस्तर. (Krushi Salla)

शेअर :

Join us
Join usNext

Krushi Salla : मागील काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे फळबाग आणि उन्हाळी पिकांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. कधी अवकाळी पाऊस पडतो तर कधी वादळी वारे वाहत आहेत.  (crop protection)

तर कधी उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. या बदलत्या हवामानात पिकांचे संरक्षण कसे करावे ह्या बद्दल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे वाचा सविस्तर. (Krushi Salla)

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार  लातूर व धाराशिव जिल्ह्यासह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Krushi Salla)

तर उद्या (२१ एप्रिल) रोजी जालना व छत्रपती संभाजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील ४ ते ५ दिवसात कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल तर येत्या २ ते ३ दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार  लातूर व धाराशिव जिल्ह्यासह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Krushi Salla)

तर उद्या (२१ एप्रिल) रोजी जालना व छत्रपती संभाजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील ४ ते ५ दिवसात कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल तर येत्या २ ते ३ दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात २४ एप्रिल पर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होईल. तर २५ एप्रिल ते १ मेदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाचा वेग पाहता, पिकास, बागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. (crop protection)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.   (Krushi Salla)

 पीक व्‍यवस्‍थापन

ऊस : ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २०% २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५% ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.

ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०% ३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.

हळद : काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे ही कामे सुरु असून पावसाचा अंदाज पाहून हळदीची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

तीळ : उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी व भारी जमिनीत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तुषार सिंचन पध्दतीने करावे. उन्हाळी तीळ पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्काची पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे सध्या आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी व बागेस आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.

अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत ००.५२.३४ @ १.५ किलो व  जिब्रॅलिक ॲसिड १ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळींब बागेत आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.

लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे.

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे चिकू बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी. उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% १० मिली किंवा  डायमेथोएट ३०% १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी. वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी.

तुती रेशीम उद्योग

उन्हाळ्यात तुती रेशीम किटक संगोपन करणारे शेतकरीमराठवाडा विभागात फार तुरळक असून त्यांनी तुती बागेला ७-८ दिवसाच्या अंतराने हलक्या जमिनीत तर भारी जमिनीत १०-१२ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.

ठिबक सिंचनद्वारे पाणी दिले तर ४३ लक्ष लिटर प्रति एकर प्रती वर्ष या प्रमाणे दिवसाला ठिबक संच ५ तास चालेल या प्रमाणे पाणी द्यावे.

रेशीम किटक संगोपन चालू असणाऱ्या शेतकऱ्यांनी ४ दिवस अगोदर बागेस पाणी द्यावे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नसेल अशा शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात २ महिने किटक संगोपन होवू नये. जमिनीला विश्रांती मिळेल, अंतर मशागतीची कामे करून घ्यावी. संगोपनगृहाचे बक्करी करण करून घ्यावे.

(सौजन्‍य: मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर: Maharashtra Weather Update: देशात नागपूर सर्वांत हॉट; पारा @ ४४.७; विदर्भ होरपळला वाचा सविस्तर

Web Title: Krushi Salla: latest news University issues agricultural advisory for crop protection Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.