Lokmat Agro >स्मार्ट शेती > Krushi salla : भाजीपाला पिकांसाठी सामान्य सल्ला वाचा सविस्तर

Krushi salla : भाजीपाला पिकांसाठी सामान्य सल्ला वाचा सविस्तर

Krushi salla: Read general advice for vegetable crops in detail | Krushi salla : भाजीपाला पिकांसाठी सामान्य सल्ला वाचा सविस्तर

Krushi salla : भाजीपाला पिकांसाठी सामान्य सल्ला वाचा सविस्तर

Krushi salla : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. (crop advice)

Krushi salla : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. (crop advice)

शेअर :

Join us
Join usNext

Krushi salla : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.  (crop advice)

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसात कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या उत्तर भागात पुढील २ ते ३ दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. (crop advice)

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात १९ मार्चपर्यंत कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त असेल. २० ते २६ मार्चदरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे. (crop advice)

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल. (crop advice)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे, उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. (crop advice)

सध्याच्या उष्ण वातावरणामुळे मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड २०% एसपी २ ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल १०.२६ ओडी १२ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५% एसजी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस : ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २०% २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५% ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०% ३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद : हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी.

करडई : वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या करडई पिकाची काढणी करून घ्यावी.

तीळ : उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी व भारी जमिनीत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तुषार सिंचन पध्दतीने करावे.  उन्हाळी तीळ पिकास खताची दुसरी मात्रा दिली नसल्यास देण्यात यावी व त्यासोबत गंधक २० किलो प्रति हेक्टरी देण्यात यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे, संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेस आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे.

नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

रेशिम किटकसंगेपन गृहात तापमापी वर २२ ते २५ अंश सेल्सिअस तापमान व ८०- ८५ टक्के आर्द्रता असेल तरच रेशीम किटक व्यवस्थीत तुती पाने खातात व वाढ व्यवस्थित होते. संगोपनगृहात हवा खेळती असावी व क्रॉस व्हेंटीलेशनची व्यवस्था करावी.

(सौजन्‍य: मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेचा कहर; काय आहे आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर

Web Title: Krushi salla: Read general advice for vegetable crops in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.