Lokmat Agro >स्मार्ट शेती > तूर पेरायला उशीर झाला मग भरघोस उत्पादनासाठी निवडा हे वाण

तूर पेरायला उशीर झाला मग भरघोस उत्पादनासाठी निवडा हे वाण

Late sowing of tur pigeon pea crop then select this variety for high yield | तूर पेरायला उशीर झाला मग भरघोस उत्पादनासाठी निवडा हे वाण

तूर पेरायला उशीर झाला मग भरघोस उत्पादनासाठी निवडा हे वाण

पाऊस लांबल्यावर आपत्कालीन पिक व्यवस्थापनात पेरणी कधी करावी व त्यात तूर पिकासाठी उशिरा पेरणीसाठी व लवकर पक्व होणारे शिफारशीत वाण कोणकोणते आहेत तेच वाण घेऊन पेरणी करावी. 

पाऊस लांबल्यावर आपत्कालीन पिक व्यवस्थापनात पेरणी कधी करावी व त्यात तूर पिकासाठी उशिरा पेरणीसाठी व लवकर पक्व होणारे शिफारशीत वाण कोणकोणते आहेत तेच वाण घेऊन पेरणी करावी. 

शेअर :

Join us
Join usNext

काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊसही झालेला नाही अशावेळी पाऊस लांबल्यावर आपत्कालीन पिक व्यवस्थापनात पेरणी कधी करावी व त्यात तूर पिकासाठी उशिरा पेरणीसाठी व लवकर पक्व होणारे शिफारशीत वाण कोणकोणते आहेत तेच वाण घेऊन पेरणी करावी. 

यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रसारित फुले राजेश्वरी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी बीडीएन ७११ ह्या दोन वाणांची उशिरा पेरणीसाठी शिफारस केली आहे.

बीडीएन ७११ वाणाचे गुणधर्म
- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विकसित.
मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य.
- कमी पाऊसमान (५५० ते ६५० मिमी.) असलेल्या भागातही चांगले येते.
- पीक कालावधी १५० ते १५५ दिवस.
- पाण्याच्या ताणास बळी पडत नाही.
- दाण्याचा रंग पांढरा, मर व वांझ रोगास प्रतिकारक.
- शेंगा एकदाच पक्व होतात. शेंगगळ नाही. यंत्राद्वारे काढणीस योग्य.
- कमी कालावधी असल्याने काढणी नोव्हेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात शक्य.
- उत्पादन: १६-१८ क्विंटल प्रती हे. (६-७ क्विंटल प्रती एकर)

फुले राजेश्वरी वाणाचे गुणधर्म
- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी विकसित.
- प्रती एकर बियाणे: १.८-२.० किलो.
- पिकाचा कालावधी: १३५-१५० दिवस.
- मर रोगासाठी सहनशील.
- वांझ रोगास सहनशील.
- लवकर पक्व होणारा वाण.
- गडद तपकिरी रंगाचे मध्यम आकाराचे दाणे.
- महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश राज्यासाठी प्रसारित
- प्रायोगिक उत्पादन: २८-३० क्विंटल प्रती हे.
- सरासरी : २२ क्विंटल प्रती हे.

अधिक वाचा: Crop Production Competition: पीक जोमात वाढवा अन् भरघोस बक्षिसं जिंका.. आजच व्हा स्पर्धेत सहभागी

Web Title: Late sowing of tur pigeon pea crop then select this variety for high yield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.