अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील महिलांना सक्षम बनविण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने मिनी ट्रॅक्टर योजना सुरू केली. यासाठी ९० टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता तीन लाख १५ हजारांची आर्थिक मदत करण्यात येते. यात बचत गटाला केव १० टक्के वाटा भरावा लागतो. केवळ ३५ हजार रुपये त्यांना भरावे लागतात.
योजनेची उद्दिष्टे
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा टोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु.3.15 लाखांची आर्थिक मदत दिली जाते.
पात्रता काय असावी लागते...
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहीवासी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती वा नवबौद्ध घटकातील असावेत, तसेच अध्यक्ष, सचिव, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत. ट्रक्टर व त्याच्या उपसाधानांच्या खरेदीवर रु. 3.15 लाख शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.
अशी असते निवड प्रक्रिया....
सुरवातीला बचत गटाची किंवा लाभार्थी सदस्याची संपूर्ण अचूक माहिती भरून अर्ज ऑनलाइन सादर करावा लागतो. आपण सादर केलेला अर्ज वैध झाल्यास या अर्जाची सारांश प्रिंट सर्व सभासदांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून ऑनलाइল सादर करावी. यानंतर वैध झालेल्या सर्व अर्जामधून चिठ्ठीच्या मदतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल. लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या साहित्याची व वाहनाची पावती ऑनलाइन सादर करणे. सादर केलेल्या पावतीवर विक्रेत्याचा GST क्रमांक, पावती क्रमांक, उपसाधनांचे अनु क्रमांक, इत्यादी विस्तृत तपशील असणे गरजेचे आहे. मूळ खरेदी पावतीसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात करणे बंधनकारक असते. लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या वाहनाचा RTO मार्फत मिळणारा वाहन परवाना ऑनलाइन सादर करणे. मूळ वाहन परवाना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक असते.
इथे साधा संपर्क
या योजनेच्या अधिक माहितीसाठी https://mini.mahasamajkalyan.in तसेच https://sjsa.maharashtra.gov.in/mr या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या ठिकाणी संपर्क साधावा.