Lokmat Agro >स्मार्ट शेती > Bank Aadhar Link : तुमचा आधार नंबर कुठल्या बँकेला लिंक आहे? असे करा चेक

Bank Aadhar Link : तुमचा आधार नंबर कुठल्या बँकेला लिंक आहे? असे करा चेक

Latest News aadhar DBT link bank account status chek Find out in detail | Bank Aadhar Link : तुमचा आधार नंबर कुठल्या बँकेला लिंक आहे? असे करा चेक

Bank Aadhar Link : तुमचा आधार नंबर कुठल्या बँकेला लिंक आहे? असे करा चेक

Bank Aadhar Link : अनेकदा काही शेतकऱ्यांचे आधार बँकेला लिंक (bank Link Aadhar) नसते किंवा कुठल्या बँकेला आधार लिंक आहे, हे लक्षात येत नसते.

Bank Aadhar Link : अनेकदा काही शेतकऱ्यांचे आधार बँकेला लिंक (bank Link Aadhar) नसते किंवा कुठल्या बँकेला आधार लिंक आहे, हे लक्षात येत नसते.

शेअर :

Join us
Join usNext

Bank Aadhar Link :  राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे (Government Scheme) पैसे अनेकदा बँक खात्यात जमा होण्यास अडचणी येतात. कारण आता आधार नंबर (Aadhar Number) महत्वाचा मानला जातो. त्या व्यक्तीचा आधार नंबर ज्या बँकेला लिंक असेल त्या बँक खात्यात पैसे जमा होतात.

पण अनेकदा काही शेतकऱ्यांचे आधार बँकेला लिंक (bank Link Aadhar) नसते किंवा कुठल्या बँकेला आधार लिंक आहे, हे लक्षात येत नसते. त्यामुळे आजच्या लेखातून तुमच्या आधार नंबरला नेमकी कोणती बँक लिंक आहे? हे तपासुयात... 

अशी आहे संपूर्ण प्रक्रिया 

  1. सर्वप्रथम गुगलवर जाऊन https://www.npci.org.in/ या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. 
  2. यानंतर आपल्यासमोर सहा पर्याय दिसतील यातील Consumer पर्यायावर क्लिक करा. 
  3. Consumer वर क्लिक केल्यानंतर पुन्हा अनेक पर्याय दिसतील. 
  4. यातील शेवटचा पर्याय असलेल्या Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) या पर्यायावर क्लिक करा. 
  5. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. 
  6. या नवीन इंटरफेसवर डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये ज्या रेषा आहे, त्यावर क्लिक करा.  
  7. इथे क्लिक केल्यानंतर काही पर्याय दिसतील, यामध्ये तुम्हाला Aadhaar Mapped Status जो चार नंबरचा पर्याय आहे, तो निवडायचा आहे. 
  8. यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या तिन्ही बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. 
  9. आधार नंबर टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकायचा आहे. 
  10. त्यानंतर खाली दिलेल्या चेक स्टेटस पर्यायावर क्लिक करायचं आहे. 
  11. तसेच आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावर आलेला ओटीपी ते टाकायचा. खाली सबमिट बटणावर क्लिक करायचा आहे. 
  12. यानंतर आपल्यासमोर संपूर्ण माहिती दिसेल. यात आधार नंबर, मॅपिंग स्टेटस दिसत आहेत. तर सर्वात शेवटी बँकेची माहिती दिसेल. 
  13. जर आपणास बँकेचे काही अपडेट दिसत नसतील तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडा. 
  14. तुम्हाला एक कार्ड दिल जाईल आणि त्यानंतर तुमचा अकाउंट आधार नंबरशी लिंक होईल. 

 

लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर पण पैसे जमा झाले नाहीत? असे करा ऑनलाईन चेक

Web Title: Latest News aadhar DBT link bank account status chek Find out in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.