Join us

Amba Bag Management : नवीन आंबा बागेमध्ये आंतरपिक घेताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:07 IST

Amba Bag Management : नवीन आंबा बागेमध्ये आंतरपीक (Intercropping In Mango Farm) घेताना काय काळजी घ्यावी, हे सविस्तर जाणून घेऊयात.. 

Amba Bag Management : नवीन आंबा बागेमध्ये (Amba Bag) कमी उंचीचे आंतरपीक घेणे चांगले असते. यामुळे आंबा झाडांची वाढ (intercropping In Mango Farm) चांगली होते. आंबा बागेमध्ये भाजीपाला, कलिंगड, भेंडी, वांगी, वाली, कोथींबीर, हिरवी मिरची यांची आंतर लागवड करता येते. नवीन आंबा बागेमध्ये आंतरपीक घेताना काय काळजी घ्यावी, हे सविस्तर जाणून घेऊयात.. 

नवीन बागेमध्ये आंतरपीक

  • बागेमध्ये कमी उंचीचे आंतरपीक घ्यावे. 
  • खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात आंतरपीक पद्धती ठरवताना जमिनीची सुपीकता देखील जपली जाईल, हे विचारात घ्यावे. 
  • पावसाळा किंवा हिवाळ्याच्या हंगामात आंतरपीक घेतले नाही तरी चालेल. 
  • परंतु, उन्हाळ्यात आपल्या शेतामध्ये कमी उंचीचे आंतरपीक घेण्याचा प्रयत्न करावा. 
  • आंतरपिकामुळे बागेत कलमांच्या मुळांभोवती सावली, गारवा राहून एकंदरीत तापमान कमी राहण्यास मदत होते. 
  • तसेच हवेतील आर्द्रता वाढून झाडांच्या जोमदार वाढीस याचा निश्चितच फायदा होतो. 
  • बागेमध्ये आंतरपीक घेतले असल्यास, आंब्याच्या कलमांना आंतरमशागत करताना इजा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :आंबाशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन