Lokmat Agro >स्मार्ट शेती > Land Management : यंदा तुम्ही जमिनीच्या प्रकारानुसार पिकाची निवड केली का? जाणून घ्या सविस्तर 

Land Management : यंदा तुम्ही जमिनीच्या प्रकारानुसार पिकाची निवड केली का? जाणून घ्या सविस्तर 

Latest News according to type of land which crops should be cultivated by farmers | Land Management : यंदा तुम्ही जमिनीच्या प्रकारानुसार पिकाची निवड केली का? जाणून घ्या सविस्तर 

Land Management : यंदा तुम्ही जमिनीच्या प्रकारानुसार पिकाची निवड केली का? जाणून घ्या सविस्तर 

Land Management : जमिनीच्या प्रकारानुसार पीक पद्धती ठरवल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळू शकतं.

Land Management : जमिनीच्या प्रकारानुसार पीक पद्धती ठरवल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळू शकतं.

शेअर :

Join us
Join usNext

भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सुपीक जमीन (Land Management) असणे अत्यंत गरजेचे असते. मात्र वेगवगेळ्या ठिकाणी जमिनीचे वेगवेगळे प्रकार आढळतात. जमिनीच्या प्रकारानुसार पीक पद्धती ठरवल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळू शकतं. यामुळेच जमिनीचे कोण कोणते प्रकार आढळतात? त्या जमिनीमध्ये कोणकोणत्या प्रकारची पिके शेतकरी घेऊ शकतात? याबद्दलच सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. कल्याण देवळाणकर यांनी माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीनुसारच पीक पद्धतीची (Crop Method0 निवड केल्यास त्यांना भरघोस उत्पन्न मिळू शकतं. सर्वसाधारणपणे अतिशय उथळ असलेल्या जमिनीवर औषधी वनस्पती किंवा गवतवर्गीय पिके घेण्याचा सल्ला देण्यात येतो. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची लागवड करणे आवश्यक असतं. तसेच जमिनीच्या प्रकारानुसार उपलब्ध ओलावा असतो. 

1. भारी काळी जमीन - 150 मिलिमीटर उपलब्ध ओलावा 
या जमिनीत सेंद्रिय कर्ब आणि चिकन मातीचे प्रमाण जास्त असते.

2. मध्यम जमीन - 45 ते 60 मिलिमीटर उपलब्ध ओलावा 
या जमिनीत पिकांची वाढ चांगली जास्त कालावधीच्या पिकांसाठी योग्य

3. 7.5  सेंटीमीटर पेक्षा कमी खोलीची जमीन - 15 ते 20 मिलिमीटर उपलब्ध ओलावा
हंगामात पिकासाठी अयोग्य, गवते वनशेती कोरडवाहू फळ जाण्यासाठी निवडावी.

4. 7.5 ते 22.5 सेंटीमीटर खोलीची जमीन - 30 ते 35 मिलिमीटर उपलब्ध ओलावा
या जमिनीत गवत, वनशेती फळबागांबरोबर सूर्यफूल, बाजरी, तूर ही पिके किंवा बाजरी + हलवा/मटकी 2:1, एरंडी + गवार 1:2,  एरंडी+ दोडका मिश्र पिकांसाठी योग्य. 

5. 22.5 ते 45 सेंटीमीटर खोलीची जमीन - 40 ते 65 मिलिमीटर उपलब्ध ओलावा. 
या जमिनीत सलग सूर्यफूल बाजरीतून याबरोबर बाजरी सूर्यफूल गवार + तूर (2:1), तूर, एरंडी+ गवार (1:2) किंवा एरंडी+दोडका (3:1) आंतरपीक

तर नवीन पिकासाठी मध्यम ते भारी लालसर तसेच पोयट्याची जमीन योग्य असते.

Web Title: Latest News according to type of land which crops should be cultivated by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.