Lokmat Agro >स्मार्ट शेती > Agriculture News : अवकाळीच्या पार्श्वभूमीवर कांदा, डाळिंब पिकासाठी कृषीसल्ला, वाचा सविस्तर 

Agriculture News : अवकाळीच्या पार्श्वभूमीवर कांदा, डाळिंब पिकासाठी कृषीसल्ला, वाचा सविस्तर 

Latest News Agricultural advisory for onion, pomegranate crops in backdrop of unseasonal weather, read in detail | Agriculture News : अवकाळीच्या पार्श्वभूमीवर कांदा, डाळिंब पिकासाठी कृषीसल्ला, वाचा सविस्तर 

Agriculture News : अवकाळीच्या पार्श्वभूमीवर कांदा, डाळिंब पिकासाठी कृषीसल्ला, वाचा सविस्तर 

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता (Nashik Rain) वर्तविल्याने कांदा, डाळिंब पिकाबाबत घ्यावयाची काळजी..

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता (Nashik Rain) वर्तविल्याने कांदा, डाळिंब पिकाबाबत घ्यावयाची काळजी..

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : नाशिक जिल्ह्यात (Nashik rain) काही ठिकाणी व घाट प्रक्षेत्रात काही भागात दि. ३१ मार्च ते ०२ एप्रिल २०२५ दरम्यान मेघ गर्जनेसह विजांचा कडकडात, ४० ते ५० किमी प्रती तास वेगासह सोसाट्याचा वारा तसेच हलका ते मध्यम पाउस पडण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने खालील उपाययोजना कराव्यात.

कांदा पिकासाठी सल्ला  (Onion Crop Advisory)

  • सद्यस्थित कांदा पिकात ढगाळ हवामानामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. 
  • तरी जांभळा व काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब @ १५ ग्रॅम किंवा अ‍ॅझोक्सीस्ट्रोबीन @ १० मिली किंवा टेब्यूकोनॅझोल @ १० मिली व त्यासोबत १० मिली स्टीकर प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात ८ ते १० दिवसांच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात. 

 

डाळिंबसाठी सल्ला 

  • सर्व नुकसान ग्रस्त फळे काढून तुटलेल्या आणि चीरलेल्या फांद्या छाटून बागेबाहेर खड्ड्‌यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. 
  • छाटलेल्या फांद्यांना आणि खोडावर १० टक्के बोर्डोपेस्ट लावावी. त्यानंतर १ टक्के बोडोंमिश्रणाची फवारणी करावी. 
  • गारपीटीमुळे झालेल्या फळांची काढणी करून फळे कुजलेली नसल्यास त्वरित विक्री करावी. 
  • नुकसानग्रस्त फळे एकत्र करून कंपोस्ट खड्यात टाकावीत. 
  • फळांच्या काढणीपुर्वी बोरिक अ‍ॅसिड @ २ ग्रॅम / लिटर पाणी या प्रमाणात संरक्षणात्मक फवारणी घेतल्यास इजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होते.
  • शक्य झाल्यास गारपीटीनंतर लगेच बोरिक अ‍ॅसिड २ ग्रॅम / लिटर झिंक सल्फेट @ २.५ ग्रॅम / लिटर + चुना @ १.२५ ग्रॅम / लिटर मॅन्कोझेब @ २.५ ग्रॅम / लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.

 

सामान्य उपाय योजना
मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट, गारपीट किंवा हलका ते मध्यम जोरदार पावसाचा इशारा लक्षात घेता पशुधन, कुक्कुटपक्षी आणि स्वतःचे संरक्षण करावे. 
जर शेतकरी शेतात असतील तर त्यांनी त्वरित जवळपास निवारा शोधावा (झाडांखाली आश्रय घेणे टाळावे. निवारा उपलब्ध नसल्यास उघड्यावर दबा धरून बसावे (आपले पाय पोटाशी व हात कानावर आणि डोळे झाकावे. विद्युत उपकरणे किंवा वायर केबलचा संपर्क टाळावा / कोणत्याही धातू, ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि दुचाकींचा संपर्क टाळावा. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.

विशेष सल्ला-
सामान्य भाजीपाला आणि फळ पिके-
सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज लक्षात घेता नवीन लावलेली फळझाडे, वेलवर्गीय भाजीपाला पिकांना बांबू किंवा काठीच्या सहाय्याने आधार द्यावा.

- पवन मधुकर चौधरी, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषि विज्ञान केंद्र मालेगाव, नाशिक 

Web Title: Latest News Agricultural advisory for onion, pomegranate crops in backdrop of unseasonal weather, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.