Join us

Agriculture News : कोबीवर्गीय पिकांसाठी सामान्य सल्ला, जाणून घ्या सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 18:48 IST

Agriculture News : सध्याचे थंड आणि मधूनच ढगाळ होणारे वातावरण (Weather Update) पिकावर परिणाम करण्यास अनुकूल आहे.

Agriculture News :  सध्याचे थंड आणि मधूनच ढगाळ (Cloudy Weather)  होणारे वातावरण मावा प्रादुर्भावास अनुकूल आहे. हिरव्या किंवा काळ्या रंगाचे मावा कोवळ्या पानातील अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि वाळून जातात. 

मावा (Mava Disease) शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकतात. हा पदार्थ पानावर साठून राहिल्याने पाने चिकट व तेलकट दिसतात. त्यानंतर या पदार्थावर काळी बुरशी वाढते. परिणामी, प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. झाडांची वाढ खुंटून उत्पादनात घट येते.

असे करा व्यवस्थापन

  1. मावा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीला पोहचल्यास, निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडूनिंबावर आधारित कीडनाशक अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  2. या फवारणीमुळे मावा किडीचे प्रमाण कमी होते व मित्र किटकांचे संवर्धन होते.
  3. जैविक कीटकनाशकांमध्ये व्हर्टिसिलीअम लेकॅनी किंवा मेटॅऱ्हायझीयम अँनिसोप्लीची २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  4. गरज पडल्यास व जैविक नियंत्रण केले नसल्यास आणि प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेल्यास, रासायनिक कीटकनाशक मॅलॅथिऑन (५० ईसी) २ मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.४ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

- ग्रामीण मौसम कृषी सेवा आणि विभागीय कृषी सेवा केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :शेती क्षेत्रफुलंभाज्याहवामान