Lokmat Agro >स्मार्ट शेती > Agriculture News : रब्बी हंगामात हरभरा, गहू पिकांत मका आंतरपीक, वाचा सविस्तर 

Agriculture News : रब्बी हंगामात हरभरा, गहू पिकांत मका आंतरपीक, वाचा सविस्तर 

Latest News Agriculture News Gram in Rabi season, intercropping maize in wheat crops, read in detail  | Agriculture News : रब्बी हंगामात हरभरा, गहू पिकांत मका आंतरपीक, वाचा सविस्तर 

Agriculture News : रब्बी हंगामात हरभरा, गहू पिकांत मका आंतरपीक, वाचा सविस्तर 

Agriculture News : मक्यासोबत इतर, इतर पिकांसोबत मक्याची लागवड करता येते. हा प्रयोग शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे.

Agriculture News : मक्यासोबत इतर, इतर पिकांसोबत मक्याची लागवड करता येते. हा प्रयोग शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News :  मका हे पीक (Maize Crop) विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते; मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खतमात्रांची आवश्‍यकता असते. मका पिकाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे मक्यासोबत इतर, इतर पिकांसोबत मक्याची लागवड (Maize Sowing) करता येते. आणि हा प्रयोगही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून मका पिकाबरोबर आंतरपीक यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. 


मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेतात. अनेकदा तूर पिकासोबत (Intercropping Tur) मक्याची लागवड केली जाते व रब्बी हंगामात बटाटे आणि आले मक्यासह लावले जातात. खरीपात सोयाबीन, कापूस तसेच रब्बीमध्ये हरभरा व गहू पिकांत आंतरपिक (Intercropping In wheat and Gram farm) म्हणून समाविष्ठ केल्यास मक्याच्या क्षेत्रात भरीव वाल होऊ शकते.

मक्याच्या दोन ओळीत असलेल्या जागेत लवकर येणारी कडधान्ये उडीद, मुग, चवळी आणि तेलबिया (भुईमुग, सोयाबीन) ही आंतरपिके यशस्वीरित्या घेता येतात. कारण दोन ओळींत अधिक अंतर असल्यामुळे आणि कमी पसारा असल्याने पिकाची सावली कमी पडते, त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कार्यक्षमपणे वापर होत असतो. 

आंतरपिक पद्धतीत ६ : ३ ओळी या प्रमाणात घेणे फायदेशीर आहे. मका पिकात भुईमुग हे आंतरपीक जोडओळ किंवा सोडओळ पद्धतीने घेता येते. रब्बी हंगामात मका पिकामध्ये करडई, कोथिंबीर, पालक आणि मेथी हि आंतरपिके भाजीपाल्यासाठी घेणे फायदेशीर आहे. पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी ४० किलो नत्र व उर्वरित ४० किलो नत्र ४५ ते ५० दिवसांनी द्यावा.

अधिकच्या माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. 

Web Title: Latest News Agriculture News Gram in Rabi season, intercropping maize in wheat crops, read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.