Join us

Krishi Mapper : कृषि मॅपर अँप कसं आणि काय काम करतं? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 3:33 PM

Krishi Mapper : जमीन आधारित योजनेच्या डेटाचे संकलन करण्यासाठी कृषी मॅपरचा (Krishi Mapper) वापर केला जातो.

Krishi Mapper :  केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतजमिनीचे जिओ-फेन्सिंग, जमिनीच्या क्षेत्राचे जिओ-टॅगिंग आणि योग्य लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रणालीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी बेसलाइन जमीन आधारित योजनेच्या डेटाचे संकलन करण्यासाठी कृषी मॅपरचा (Krishi Mapper) वापर केला जातो. याद्वारे अचूक जमिनींचे मोजमाप होण्यास मदत झाली आहे. जाणून घेऊया या अँपबद्दल... 

2023-24 च्या खरीप मोहिमेच्या (Kharif Season) राष्ट्रीय कृषी परिषदेत, भारताच्या केंद्रीय कृषिमंत्र्यांनी कृषी मॅपर लाँच केले होते. आजतागायत अनेक शेतकऱ्यांना कृषी मॅपर अँप उपयुक्त ठरले आहे. हे अँप पीक माहिती, जमीन क्षेत्र मोजमाप आणि भू-प्लॉटिंग कार्यप्रणालींसह तपशीलांचे सर्वेक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले एक ऍप्लिकेशन आहे. हे शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या कागदपत्रांच्या उद्देशाने जमिनीच्या क्षेत्राचे मोजमाप कारण्यासाठी शिवाय शेत पिकांच्या इतर माहिती मिळवण्यासाठी, जतन करण्यासाठी मदत करते. 

शिवाय या अँपमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन, प्रति ड्रॉप अधिक ड्रॉप, राष्ट्रीय कृषी पायाभूत वित्तपुरवठा सुविधा, माती आरोग्य कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड), प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ यासह २० हुन अधिक योजना जोडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअरमधून हे अँप डाऊनलोड केल्यानंतर त्याचा वापर करता येणार आहे. त्याचबरोबर अँपमध्ये दिलेल्या इतरही योजनांची माहिती यातून मिळण्यास मदत होणार आहे. 

हे अँप काय काम करते.... 

  • विविध योजनांसाठी एकत्रित आणि एकसमान शेतजमिनीचा डेटाबेस विकसित करणे. 
  • पुराव्यावर आधारित निर्णय निरीक्षणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भू-निर्देशांक आणि बहुभुज संकलित करण्यासाठी
  • योजना राबविताना अँपमधील अचूक माहिती महत्वपूर्ण ठरेल. 
  • जमिनीवर आधारित योजना संबंधित सर्व डेटा एकाच ठिकाणी पाहण्यास मिळेल. 
  • जमिनीवर आधारित योजनेशी संबंधित डेटाचे विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशनसाठी उपयुक्त 

 

या अँपचा वापर कसा कराल? (How to use Krishi Mapper app?)

  • सुरवातीला प्ले स्टोअरवर जा. 
  • येथून KrishiMapper हे अँप डाऊनलोड करा. 
  • डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला लॉग इन चा पर्याय दिसेल. 
  • यानंतर तुम्ही जमिनीच्या मोजमापासह अँपमधील इतर योजनांचा लाभ घेऊ शकता. 
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीकृषी योजना