Amba Bag Management : आंबा बागेतील पाणी व्यवस्थापन (Mango Crop Water Management) करण्यासाठी, जमिनीचा प्रकार, हंगाम, पाण्याची उपलब्धता या गोष्टींचा विचार करावा लागतो. आंबा हे पावसाच्या पाण्यावर येणारे पीक असले तरी, कलमे लावल्यानंतर पहिली दोन ते तीन वर्षे पाणी देणे आवश्यक असते.
दरम्यान नव्याने आंबा बाग (Mango Crop) तयार झालेली असल्यास या आंबा बागेस लहान फळधारणा होत असते. अशावेळी फळगळ कमी करण्यासाठी पाणी व्यवस्थापन करणे महत्वाचे ठरते. या काळात नेमके आंबा बाग पाणी व्यवस्थापन कसे करावे, हे जाणून घेऊयात....
आंबा बाग पाणी व्यवस्थापन
- वाटाणा ते सुपारी आकाराची फळधारणा झालेल्या बागेतील फळांची गळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या तीन ते चार पाळ्या द्याव्यात.
- झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
- नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना हिवाळ्यात पहिल्या वर्षी आठवड्यातून एकदा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून एकदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून एकदा प्रत्येक, कलमाला दोन बादल्या (३० लिटर) पाणी द्यावे.
- उन्हाळ्यात पाणी वरीलप्रमाणेच परंतु दोनवेळा (दुप्पट मात्रा) दयावे.
- जागेवरच रोपे वाढवून त्यावर कलमे केल्यास त्यांना पाणी द्यावे लागत नाही.
- ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंबा कलमांना केलेल्या अळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी