Join us

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी अर्ज केला का? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 9:52 PM

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई महाराष्ट्र शासन वनविभागाकडून संबधित कुटुंबाला देण्यात येते.

अलीकडे वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे. शिवाय काही ठिकाणी पशुधनावर हल्लाही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पशुधनाचा मृत्यूही झाला आहे. कधी कधी तर एखाद्या माणसाचा देखील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. अशावेळी संबंधित कुटुंबासाठी नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. नेमकं कसा आणि कुठे अर्ज करावा हे पाहुयात. 

खालील तीन गोष्टीसाठी अर्ज करता येतो. 

जर तुम्हाला पशुधनाच्या नुकसानीची भरपाई मिळवायची असल्यास प्रथम घटना घडल्यापासून 48 तासांच्या आत घटना घडल्याचा दिनांक संबंधित वन अधिकारी यांना घटनेबाबत कळविल्याचा घोषणापत्र, घटनास्थळावरून मृत जनावराचे शव न हलविल्याचे अर्जदाराचे प्रमाणपत्र, अर्जदाराचा बँक खाते तपशील. 

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास घटना घडल्यापासुन ४८ तासांचे आंत घटना घडल्याचा दिनांक व संबंधीत वन अधिकारी (नावासह) यांना कळविल्याचे घोषणापत्र, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्राची प्रत (मृत्यु प्रकरणी), मृत्यु प्रकरणी वारसदाराबाबत तपशील व संबंधीत दस्ताऐवज. जखमी व्यक्ती यांचे स्वतःचे व मृत्युप्रकरणी वारसदाराचे बैंक खाते तपशील, जखमी प्रकरणी वैद्यकीय उपचारापोटी झालेल्या खर्चाची देयक. गावाचे सरपंचा यांचा ग्राम रहीवाशी दाखला, जखमी प्रकरणी प्राधिकृत वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र (व्यंगत्व आले असल्यास), पोलीस पंचनामा व तत्सम कागदपत्रे, पोलीस खात्याचा inquest पंचनामा.

वन्यप्राण्यांच्या हानीमुळे पीक नुकसान झाले असल्यास घटना घडल्यापासुन 3 दिवसांचे आंत अर्ज सादर करावा. संबंधीत क्षेत्राचा नमुना ७/१२ व नकाशाची प्रत, गावाचे सरपंचा यांचा ग्राम रहीवाशी दाखला, संबंधीत शेतमालकाचे बँक तपशील 

अर्ज कसा आणि कुठे करावा...? 

एखाद्या गावातील कोणत्याही कुटुंबातील नुकसान झाल्यास सर्वात आधी वनविभागाच्याmahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागतो. या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला फॉरेस्ट पोर्टल नावाचं एक पर्याय दिसू लागेल. यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये वनविभागाकडून कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात, हे समजून येईल. महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टल या पेजवरील वन्य प्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानी करता नुकसान भरपाई मंजूर करणे, यातील ॲप्लिकेशन फॉर्म या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर यासंबंधीच्या नुकसान भरपाईचा अर्ज तुमच्या समोर ओपन होईल. मनुष्य, पशुधन, शेती यापैकी प्रकार निवडायचा आहे आणि मग संबंधित प्रकारानुसार अर्ज भरायचा आहे

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीजंगलवनविभागशेतकरी