Mini Tractor Yojana : अनुसूचित जाती आणि नव बौद्ध समाजातील जे घटक असतील अशा घटकातील बचत गटांना (Bachat Gat) अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने दिली जातात. या पार्श्वभूमीवर आता नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचा आवाहन करण्यात आले आहे.
2017 च्या जीआर नुसार राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि नव बौद्ध या घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर Mini Tractor Yojana) आणि त्याची उप साधने दिली जातात. यामध्ये प्रकल्प खर्च साडेतीन लाख रुपये ग्राह्य धरून 03 लाख 15 हजार रुपयांचा अनुदान बचत गटांना दिले जाते. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या (Samaj Kalyan Vibhag) माध्यमातून करण्यात आले आहे.
दरम्यान ऑनलाईन अर्जासाठी https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत. याच वेबसाईटवर 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. ऑनलाइन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी सोडून समाज कल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
अटी व शर्ती
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असावेत
- स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
- तसेच अध्यक्ष सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत.
- ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधानांच्या खरेदीवर रु ३.१५ लाख शासकीय अनुदान अनुजेय राहील.
- ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.