Lokmat Agro >स्मार्ट शेती > अटल बांबू समृद्धी योजना, अनुदानावर रोपे घ्या अन् हिरवे सोने पिकवा... ! 

अटल बांबू समृद्धी योजना, अनुदानावर रोपे घ्या अन् हिरवे सोने पिकवा... ! 

Latest News Atal Bamboo Prosperity Yojana, get 175 rupees subsidy on seedlings | अटल बांबू समृद्धी योजना, अनुदानावर रोपे घ्या अन् हिरवे सोने पिकवा... ! 

अटल बांबू समृद्धी योजना, अनुदानावर रोपे घ्या अन् हिरवे सोने पिकवा... ! 

बांबू शेतीला चालना मिळावी, यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबविली जात आहे.

बांबू शेतीला चालना मिळावी, यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबविली जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गडचिरोली : बांबू शेतीला चालना मिळावी, यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत यापूर्वी तीन वर्षांसाठी प्रतिरोपे 120 रुपये अनुदान विभागून यात वाढ दिले जात असून, 175 रुपये एका रोपट्यामागे तीन वर्षे विभागून मिळणार आहेत. शेतात 'हिरवे सोने' पिकवण्याची संधी शेतकऱ्यांना आहे.

दरम्यान यापूर्वी १ हेक्टर क्षेत्राकरिता ६०० टिश्यू कल्चर रोपे सवलतीच्या दरात दिले जात होते. मात्र, रोपांच्या देखभालीकरिता यापूर्वीच्या शासन निर्णयात तरतूद करण्यात आलेली नव्हती, आता २८ फेब्रुवारी  २०२४ रोजी महसूल व वन विभागाने शासन निर्णय निर्गमित करीत शेतकऱ्यांना दोन हेक्टरसाठी १२०० रोपटी लागवड व देखभालीच्या खर्चासाठी १७५ रुपये प्रतिरोपटे तीन वर्ष विभागून मिळणार आहेत. 


काय आहे योजना?

अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत तीन वर्षाकरिता प्रतिरोपे ३५० रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून तीन वर्षात शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. वन विभागातर्फे शेतकचाना रोपट्यांचा पुरवठा करण्यात आल्यास त्या रोपांची किमत अनुदानाच्या पहिल्या वर्षातील हपत्त्यामधून वजा केली जाणार आहे. शेतकयांना पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही.


रोपट्यांच्या संगोपनासाठी अनुदान

राष्ट्रीय बांबू अभियान योजनेच्या समरूप अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सवलतीत बांबू रोपे उपलब्ध करून देण्यासोबतच खत, निदणी, पाणी देणे, संरक्षण या कामासाठी अनुदान दिले जाणार आहे. मागील पाच वर्षांत रोजंदारी मजुरीचे दर वाढले असल्याने शेतकऱ्यांना प्रतिरोपटे १७५ रुपये दिले जातील. हे अनुदान तीन वर्षासाठी राहणार असून, पहिल्या वर्षी ९० रुपये, दुसऱ्या वर्षी ५० रुपये, तिसऱ्या वर्षी ३५ रुपये प्रतिरोपटे दिले जातील.


कोणाला मिळणार लाभ?

शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी, बांबू शेतकयांचा समूह यातील सभासदांनी एकत्रित अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतरच वैयक्तिक शेतकऱ्यांचा विचार केला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र बाबू विकास मंडळ वनवृत्त समन्वयक नितीन कावडकर म्हणाले कि, सवलतीच्या दरात बांबू घेऊन शेतकऱ्यांना आपल्या शेतात बांबू लागवड करता येईल, यासाठी शेतकयांना अनुदान मिळेल. शेतकऱ्यानी जर खासगी रोपवाटिकेतून रोपे घेतल्यास त्याचे बिल सादर करावे लागेल. अधिकाधिक शेतकयांनी या योजनेचा लाभ घ्यावा. 

टिश्यू कल्चर बांबू रोपाकरिता ८ प्रजाती

विदर्भात आढळून येणारी मानवेल, कटांग तर कोकण विभागात आढळणारी मानगा ही स्थानिक प्रजाती बांबू लागवडीसाठी शासनाने ग्राह्य धरली आहे. याशिवाय बालकुआ, डॅड्रोकॉल्मस ब्रांडीस्ली, अॅस्पर, नूतन, तुलडा आदी पाच प्रजाती निवडण्यात आलेल्या आहेत, प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या समितीच्या शिफारशीनुसार अन्य प्रजातीची निवड करता येईल. तसेच अधिक माहितीसाठी https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=bambooapp या लिंकवर क्लिक करा..

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

Web Title: Latest News Atal Bamboo Prosperity Yojana, get 175 rupees subsidy on seedlings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.