Lokmat Agro >स्मार्ट शेती > कृषी सल्ला : वाढत्या उन्हात भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी, वाचा सविस्तर 

कृषी सल्ला : वाढत्या उन्हात भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी, वाचा सविस्तर 

latest News Care of vegetable crops during growing summer, read in detail | कृषी सल्ला : वाढत्या उन्हात भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी, वाचा सविस्तर 

कृषी सल्ला : वाढत्या उन्हात भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी, वाचा सविस्तर 

भाजीपाला पिकांवर तापमानाचा परिणाम कमी कारण्यासाठी काय काळजी घ्यावी? हे समजून घेऊयात..

भाजीपाला पिकांवर तापमानाचा परिणाम कमी कारण्यासाठी काय काळजी घ्यावी? हे समजून घेऊयात..

शेअर :

Join us
Join usNext

उन्हाळ्यात भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. या भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत असते. मात्र वाढत्या तापमानामुळे भाजीपाला पिकांवर ताण वाढत असतो. त्यामुळे भाजीपाला पिकांवर तापमानाचा परिणाम कमी कारण्यासाठी काय काळजी घ्यावी? याबाबत मालेगाव कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून भाजीपाला पिकांसाठी सल्ला देण्यात आला आहे.  

उन्हाळी हंगामात कृत्रिम किंवा जैविक आच्छादनांचा वापर करावा. शक्यतो जैविक आच्छादनांसाठी पालापाचोळा, गव्हाचा भुसा इ. चा वापर करावा. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सच्छिद्र प्लास्टिक जाळीचा वापर पिकांवर करावा, फुलोरा आणि फळ काढणीच्या काळात सकाळी, संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी एकसारख्या प्रमाणात करावा. भर उन्हात पाणी देणे कटाक्षाने टाळावे. झाडावरील जुनी, रोगटपाने, रोगग्रस्त फळे आणि फांद्या काढून शेताच्या बाहेर टाकाव्यात.

फुल अथवा फळगळ कमी करण्यासाठी १० ते २० पीपीएम तीव्रतेचे एन.ए.ए. या संजीवकाची। ते २ वेळा फवारणी करावी. टोमॅटो पिकात लवकर येणाऱ्या करप्याच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २.५ रॉली पाणी आणि टेब्यूकोनॅझोल १ मिली/ ली पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या घ्याव्यात. वेलवर्गीय पिकांमध्ये केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झील एम २.५ रॉली पाणी किंवा अॅझोक्झीस्ट्रोबीन १ मिली/ली पाणी या प्रमाणात १० दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या घ्याव्यात.

मिरची पिकावरील फुलकिडी आणि पांढरी माशी नियंत्रणासाठी डायमिथोइट ३०% २ मिली किंवा फिप्रोनील ५% इ.सी. १.५ मिली। ली पाणी या प्रमाणात गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या घ्याव्यात.

स्त्रोत - राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर, राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्थान, माळेगाव, बारामती आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

Web Title: latest News Care of vegetable crops during growing summer, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.