Join us

तरुणांनो स्वतःच व्यवसाय सुरु करायचा आहे? ही योजना तुमच्यासाठी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 7:38 PM

ज्या तरुणांना स्वतःचा उद्योग निर्माण करायचा आहे, त्यांना ही योजना अत्यंत लाभकारी ठरणार आहे.

राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यक्रम करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या योजना राबवून तरुणांना आर्थिक साहाय्य करण्याचा प्रयत्न करत असते. यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ज्या तरुणांना स्वतःचा उद्योग निर्माण करायचा आहे, त्यांना ही योजना अत्यंत लाभकारी ठरणार आहे.

काय आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना सोय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना बँकेचे कर्ज व शासनाचे अनुदान देऊन स्वतःचा उद्योग सुरू करण्यास चालना देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आगामी पाच वर्षात किमान एक लाख उद्योग सुरू होऊन त्यातून दहा लाख रोजगार निर्मिती हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

पात्रता काय आहे? 

या योजनेसाठी अर्जदाराचे वय किमान 18 व जास्तीत जास्त 45 असावे, या योजनेसाठी एससी एसटी व महिला तसेच विशेष प्रवर्गासाठी पाच वर्ष सूट देण्यात आली असून कुठलेही स्थायी उत्पन्न नसावे, हे निकष पूर्ण करणारी युवक युक्ती ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात तसेच या प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रे, शिक्षण, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र प्रकल्प अहवाल, उद्योग सूचीतील उद्योग निवडून नोंद करणे.

अर्ज कोठे व कसा करायचा?

सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग केंद्राकडे ऑनलाईन अर्ज करावा लागतो. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या शासनाच्या पोर्टलवर जाऊन देखील अर्ज करता येऊ शकतो. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठीhttps://maha-cmegp.gov.in/homepage या संकेत स्थळाला भेट द्यावी.

कुणाला किती अनुदान 

या योजनेचे माध्यमातून सातवी उत्तीर्ण उमेदवारासाठी 25 लाखांपर्यंत तर दहावी उत्तीर्ण असलेल्या पात्र अर्जदारांना 50 लाखांपर्यंत कर्ज मंजूर केले जाते. अनुसूचित जाती जमाती ग्रामीण भागात 35 टक्के तर शहरी भागात 25 टक्के अनुदान मिळते. उर्वरित प्रवर्गांना अनुक्रमे 15 ते 25 टक्के अनुदान मिळते. तरुणांना रोजगार निर्माण व्हावा, या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्राने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी मीटिंग घेऊन संबंधित बँकांशी संपर्क साधून जास्तीत जास्त प्रकरणी कशी मंजूर होतील, याकडे लक्ष देण्यात येत आहे. बेरोजगार युवक युतीसाठी ही योजना अतिशय प्रभावी असल्याचं जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी सांगितले

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… 

टॅग्स :शेतीएकनाथ शिंदेशेतकरीशेती क्षेत्र