Lokmat Agro >स्मार्ट शेती > Crop Management : असे करा सोयाबीन व तूर पिकातील रुंद व अरुंद पानांच्या तणांचे नियंत्रण, वाचा सविस्तर

Crop Management : असे करा सोयाबीन व तूर पिकातील रुंद व अरुंद पानांच्या तणांचे नियंत्रण, वाचा सविस्तर

Latest News Control of Broad and Narrow Leaf Weeds in Soybean and Tur Crops, Read Details | Crop Management : असे करा सोयाबीन व तूर पिकातील रुंद व अरुंद पानांच्या तणांचे नियंत्रण, वाचा सविस्तर

Crop Management : असे करा सोयाबीन व तूर पिकातील रुंद व अरुंद पानांच्या तणांचे नियंत्रण, वाचा सविस्तर

Weeds Management : सोयाबीन, तूर पिकात रुंद आणि अरुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी हे कराच..

Weeds Management : सोयाबीन, तूर पिकात रुंद आणि अरुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी हे कराच..

शेअर :

Join us
Join usNext

Weeds Management : सध्या राज्यातील शेतकरी लागवडीच्या (Cultivation) कामात व्यस्त असून अनेक भागात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. अशात सोयाबीन, तूर पिकाचेही (soyabean Crop) व्यवस्थापन शेतकऱ्यांकडून सुरु आहे. मात्र सध्या सोयाबीन तूर पिकात रुंद आणि अरुंद पानांच्या तणांची वाढ झाली आहे. तणे पिकांच्या शेतात वाढतात आणि इष्ट वनस्पतींच्या वाढीस प्रतिबंध करतात, त्यामुळे तणांचे नियंत्रण करणे आवश्यक असते. 


सलग सोयाबीन, सलग तूर किंवा सोयाबीन + तूर आंतरपीक किंवा मिश्र पिकातील रुंद व अरुंद पानांच्या तणांचे नियंत्रण करणेसाठी खालील पैकी एका तणनाशकाचा वापर करावा.

१. इमाझाथापर १०% एस एल + सर्फेकटन्ट   (परशुट)              
मात्रा : ७५० मिली + एमएसओ  सर्फेकटन्ट २.० मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात प्रति हेक्टरी फावरावे.
2. फोमेसेफेन १७.५% + क्लोडीनाफोप प्रोपारजील  १२.५% एम ई .
प्रमाण : १००० मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे.
3. प्रोप्याक्वेझाफॉप २.५ % + इमॅझाथापर ३.७५ % एम इ ( शाकेद).    प्रमाण : २००० मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे.
4. इमाझाथापर ३५% + इमाझामॉक्स ३५% (ओडीसी) प्रमाण प्रति हेक्टर: १०० ग्रॅम + एम एस ओ ऍडजूयेन्ट @ २ मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणात ३७५ ते ५०० लिटर पाण्यातून एक हेक्टर क्षेत्रावर फवारावे.

महत्वाच्या सुचना :
 

वरील सर्व तणनाशके उगवणीनंतर पीक १८ ते २५ दिवसाचे असताना व तणे ३ ते ४ पानावर असताना पाठीवरील न्यापस्यक पंपाद्वारे फ्ल्डजेट नोझाल वापरून फवारणी करावी.  तसेच तणनाशके फवारणी करताना जमिनीत पुरेशी ओल असावी. फवारणी केले नंतर कमीतकमी आठ तास पाऊस पडणार नाही याची कात्री करावी. शिफारशीत मात्रा पेक्षा अधिक प्रमाणात तणनाशकांचा वापर करू नये, तणनाशकाचा वापर त्याच्या सोबत दिलेल्या लेबल नुसार काळजी पूर्वक करावा. तसेच तणनाशकाचा वापर त्याच्या सोबत दिलेल्या लेबल नुसार काळजी पूर्वक करावा, असा सल्ला देखील डॉ. कांबळे यांनी दिला आहे. 

संकलन : डॉ. अरुण भाऊराव कांबळे, माजी प्राध्यापक, कृषिविद्या, कृषि महाविद्यालयाचे, पुणे

Web Title: Latest News Control of Broad and Narrow Leaf Weeds in Soybean and Tur Crops, Read Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.