Lokmat Agro >स्मार्ट शेती > Cotton Disease : कापूस पिकातील लाल पानांसाठी 'हे' नक्की करा, वाचा सविस्तर 

Cotton Disease : कापूस पिकातील लाल पानांसाठी 'हे' नक्की करा, वाचा सविस्तर 

Latest News Cotton Red leaf disease what is solution read in detail  | Cotton Disease : कापूस पिकातील लाल पानांसाठी 'हे' नक्की करा, वाचा सविस्तर 

Cotton Disease : कापूस पिकातील लाल पानांसाठी 'हे' नक्की करा, वाचा सविस्तर 

Cotton Disease : नाशिक जिल्हातील नांदगाव, मालेगाव, येवला भागातील परिसरामध्ये कापूस पिके हि लाल पडून वाढ सुद्धा खुंटलेली दिसत आहे.

Cotton Disease : नाशिक जिल्हातील नांदगाव, मालेगाव, येवला भागातील परिसरामध्ये कापूस पिके हि लाल पडून वाढ सुद्धा खुंटलेली दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Crop Management : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कापूस पिकाची (Cotton Crop) लागवड करतात. सद्यस्थितीत नाशिक जिल्हातील नांदगाव, मालेगाव, येवला भागातील परिसरामध्ये कापूस पिके हि लाल पडून वाढ सुद्धा खुंटलेली दिसत आहे. सोबत काही ठिकाणी आकस्मित मर (पॅराविल्ट) चे प्रमाण काही भागात दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

लाल पाने हा एक कपाशी पिकातील (Lalya Disease) विकार असुन तो प्रामुख्याने जास्त उत्पादन देणाऱ्या कपाशीमधे आढळून येतो. झाडाच्या पानातील हरीत द्रव्य प्रकाशाच्या सहाय्याने अन्न तयार करून आंतरप्रक्रियेने ते झाडाच्या विवीध भागात पोहचवल्या जाते. झाडाच्या अन्न तयार करण्याच्या व आंतरप्रक्रियेने ते झाडाच्या विवीध भागात पोहचवण्याच्या नैसर्गीक क्रियेमधे विवीध कारणांमुळे बाधा उत्पन्न होउन पानातले हरीत द्रव्याचे प्रमाण कमी हाते व त्याची जागा अन्थोसायनीन हे रंगद्रव्याचे घेते आणि या द्रव्यामुळेच पानाला लाल रंग येतो.

यावर करावयाच्या उपाययोजना

शेतकरी बांधवानी लवकरात लवकर खतमात्र द्यावी.
१३:००:४५ किंवा १९:१९:१९ चे ५ ग्रम/लिटर किंवा नॅनो युरीयाची ४ मिली/लिटर प्रमाण घेऊन फवारणी करावी
मॅग्नेशियम ची कमतरता दूर करण्यासाठी १ टक्का मॅग्नेशियम सल्फेट ची फवारणी करावी.

आकस्मित मर रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसल्यास 

दीड किलो युरिया + दीड किलो पोटॅश १०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी कारावी त्या नंतर ८ ते १० दिवसांनी २ किलों डी ए पि १०० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण ५० ते १०० मिली झाडाजवळ द्यावे किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम + युरिया १० ग्रॅम प्रती लिटर हे प्रमाण घेऊन फवारणी करावी. 

Web Title: Latest News Cotton Red leaf disease what is solution read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.