अमरावती जिल्ह्यातील सिट्रस इस्टेट, चांदूरबाजार व तालुका कृषि अधिकारी कार्यालय, चांदूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यातील ब्राम्हणवाडा पाठक, वणी बेलखेडा, कुरणखेड, घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, जसापुर, काजली व मांधान, हैदतपुर वडाळी, फुबगाव, कुरळपूर्णा, थुगाव, पिपंरीपूर्णा, शिरजगाव कसबा, करजगाव आणि खरपी गावातील संत्रा बागाना भेटी दिल्या. भेटी दरम्यान खालील बाबी निदर्शनास आल्या.
सद्यपरिस्थितीत सतत चालू असलेला पाऊस, ढगाळ वातावरण, अपुरा सूर्यप्रकाश त्यामुळे वनस्पतीशास्त्रीय व रोगामुळे फळगळ निदर्शनास आली.
अ) फळगळ वनस्पती शास्त्रीय कारणे
- झाडांची सुदृढता
- संजिवकाचा असमतोल व नत्राची कमतरता
- अन्नद्रव्याची कमतरता
- जमिनीतील आद्रता
ब) किडींचा प्रादुर्भाव फळगळ
क) रोगामुळे होणारी फळगळ
झाडावर फळे पोसण्यासाठी संजीवकाची गरज असते. या संजीवकाचा अभाव हवामानातील बदलामुळे होतो. फळांच्या वाढीसाठी नत्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. नत्रामुळे पेशीक्षयाची कीया मंदावते तसेच ऑक्झिन या संजीवकाच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता असते पानातील एकूण नत्रापैकी अमोनिया-अमोनिअम या संयुगाची मात्रा फळांच्या सशक्त वाढीसाठी आवश्यक आहे. या संयुगाची मात्रा कृत्रिमरित्या यूरियाची फवारणी केल्याने वाढवता येते.
फळांची योग्य वाढ होण्यासाठी अन्नद्रव्याचा नियमित पुरवठा होणे आवश्यक आहे. शिफारसीनुसार सेंद्रिय, रासायनिक तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये झाडांना देण्यात येत नाहीत त्यामुळे फळांची वाढ होत नाही व लहान फळांची गळ होते. अपुरे पोषण व आणि संजिविकांचा असमतोलपणा निर्माण झाल्यास पेशीक्षय होऊन फळगळ होते.
चांगल्या जमिनीत हवा व पाणी प्रत्येकी २५ टक्के असे असते. जमिनीतील हवा व पाणी यांचे प्रमाण बिघडले तर पावसाळयात होणा-या सततच्या पावसाच्या पाण्याने जमिनीतील मुळे कुजतात व मुळांना प्राणवायु कमी मिळतो. त्यामुळे फळगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सततच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा सुध्दा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे सुध्दा त्यावर नियंत्रण करणे गरजेचे आहे.
- उपाययोजना
- पावसाळयात बगीच्यात पाणी साचू देवू नये. जास्तीचे पाणी काढून देण्यासाठी उताराच्या आडव्या दिशेने प्रत्येकी दोन ओळीनंतर ३० से मी खोली, ३० से.मी. खालची रुंदी व ४५ से. मी. वरची रुंदी असलेले चर खोदावेत. जेणे करुन पाण्याचा निचरा लवकर व प्रभावीपणे होईल.
- वनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळ कमी करण्यासाठी एन.ए.ए. १ ग्रॅम (१० पीपीएम) किवा २.४-डो १५ ग्रॅम (१५पीपीएम) किंवा जिबलीक अॅसीड १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) १३:०० ४५ किंवा युरिया १ किलो (१ टक्का) १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- देठ सुखी किंवा कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट व अल्टरनेरीपा बुरशीमुळे होणारी गळ कमी करण्यासाठी बोर्डक्स मिश्रणाची ०६ टक्के किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ३० ग्रॅम किंवा अझोक्सस्ट्रोबिन अधिक डायफेनकोणाझोल १० मिति प्रती १० लिटर पाणी या बुरशीनाशकाच्या एक महिन्याच्या अंतराने जुलैपासून तीन फवाराण्या कराव्या.
- डीप्लोडीया बुरशीमुळे उद्भवणारी फळगळ याकरिता कार्बनडाझीम १२% + मंकॉझेब २५% डब्लुपी (मिश्र घटक)* किवां थायोफिनेट मिथिल २५% + मंकॉझेब २५% डब्लुजी (मिश्र घटक) २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- फायटोप्थोरा बुरशीमुळे उद्भवणारी तपकरी कुज यामूळे होणाऱ्या फळगळ व्यवस्थापनासाठी फोसेटील-एल २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. गळून पडलेली फळे लवकरात लवकर उचलून दूर फेकून द्यावीत किंवा खड्ड्यात पुरवावी.
- नॅफशॅलीन अॅसेटिक अॅसिड (एन.ए.ए.) किंवा २,४-डी पाण्यात पूर्णपणे विरघळत ४०-५० मि.ली. अल्कोहोल किंवा अॅसिटोन मध्ये विरघळून घ्यावीत. नसल्यामुळे झाडावर भरपुर पालवी राहावी म्हणुन अन्नद्रव्यांचा शिफारसीनुसारं वापर करावा. सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळुन आल्यास त्वरीत पुरवठा करावा.
- संत्र्यांचा अधिक दर्जेदार उत्पादनाकरिता प्रत्येक झाडाला शिफारसीत मात्रा जमिनीतून ५० किलो शेणखत अधिक ७. ५ किलो निबोंळी ढेप, ९०० ग्रॅम नत्र (१९५३ ग्रॅम युरिया), ३०० ग्रॅम स्फुरद (१८७५ ग्रॅम सिंगल सुपर स्फॉस्फेट), ३०० ग्रॅम पालाश (५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) यासह ५०० ग्रॅम व्हॅम, १०० ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू, १०० ग्रॅम अॅझोस्पीरीलम, १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति झाड देण्यात यावे. नत्र (३०, ३०, २०, १० व १० टक्के) स्फुरद (४०, ३५ व २५ टक्के) व पालाश (१०, १०, ३०, २५ व २५ टक्के) या टक्केवारीत एक महिण्याच्या अंतराने पाच भागात विभागून द्यावा. फक्त नत्र, स्फुरद व पालाश हीच खते विभागून पाच भागात द्यावी इतर नाहीत. जैविक खते व रासायनिक खते एकाच चरात देऊ नये.
- नागपूर संत्र्याचे अधिक उत्पादन व दर्जेदार फळे मिळण्याकरिता तसेच अधिक आर्थिक मिळकतीकरिता पाण्यात विरघळण्या-या खताची मात्रा ९६० ३२० ३२० ग्रॅम प्रति झाड नत्र स्फुरद पालाश ठिबक सिंचनाव्दारे १५ दिवसाच्या अंतराने २० वेळा विभागून देण्याची शिफारस करण्यात येत आहे.
- संत्र्याकरीता ठिबक द्वारे अन्नद्रव्ये व्यवस्थापन : आंबिया बाहाराच्या फळासाठी आगस्ट महिन्यात २४ ग्रॅम नत्र (५२ ग्रॅम युरिया) २० ग्रॅम पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश ३३ ग्रॅम प्रतिझाड १५ दिवसाच्या अंतराने द्यावे. फवारणी द्वारे जस्त सल्फेट ०.५ टक्के लोह सल्फेट ०.५ टक्के बोरॉन ०.१ टक्केच्या द्यावे. ( जमिनी द्वारे सुक्ष्म अन्न द्रव्य मात्रा न दिलेली असल्यास अथवा फळ गळ दिसून आल्यास फवारणी आवश्यक.
- येणारे किड रोग व त्यावरील उपाययोजना
फळमाशी- फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्याकरिता फळमाशी सापळे (Methyl Eugenol) प्रती हेक्टरी २० ते २५ या प्रमाणात ऑगस्ट महिण्याच्या पहिल्या आठवड्यापासून किवा तोडणीच्या साधारण २% ते ३ महिने आधीपासून बागेत झाडांवर टांगून ठेवावेत. बागेतील खाली पडलेली फळे वेचून नष्ट करून बाग स्वछ ठेवावी फळमाशीची कोषावस्था जमिनीत २ ते ३ सेंटिमीटर खोलीपर्यंत असते झाडाखालील माती हलवून किंवा निंदून घ्यावी.
- संत्रा फळ पिकातील रस शोषक पतंगाचे व्यवस्थापन :
संत्रा रस शोषक पतंग किडीसाठी संत्रा पिकाच्या व्यतिरिक्त असलेल्या यजमान तणाचां नाश करावा उदा. गुळवेल, वासनवेल, चांदवेल इ. यजमान तणावर या किडीची अळी अवस्था राहते. साधारणत सायंकाळीच्या वेळी (७ ते रात्री ११) या कालावधी मध्ये बागेच्या बांधावर गवत पेटवून धूर करावा. फळ पक्वतेच्या वेळी बागेच्या चार हि कोपऱ्यामध्ये तसेच मध्यभागी एक मर्क्युरी प्रकाशाचे दिवे लावावेत आणि दिव्यांच्याखाली पसरट भांड्यामध्ये केरोसीन ओतून ठेवावे. रसशोषण करणाऱ्या पतंगाकरिता विषारी आमिषे तयार करुन बागेत ठेवावी. या करीता मॅलॅथिऑनं ५० ईसी १० मिली + १०० ग्रॅम गुळ खाली पडलेल्या फळांचा रस १०० मिलि व ९०० मिलि पाण्यात मिसळून प्रत्येकी दोन आमिषे रुंद तोंडाच्या दोन बाटल्यात टाकून प्रत्येक २५ ते ३० झाडांमध्ये एक या प्रमाणात ठेवावे. फळ हिरव्या रंगामधून पिवळसर रंगामध्ये रुपांतर होत असताना १०-१५ दिवसाच्या अंतराने फळ तोडणी होईपर्यंत निंबोळी तेल-निम ऑईल- १० मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागेतील खाली पडलेली फळे वेचून खड्यात पुरून बाग स्वछ ठेवावी
संत्रा फळाची तोडणी झाल्यानंतर लगेच कळलेल्या फायागी छाटणी करावी किया पावसाळयापुर्वी, रोगट व वाळलेल्या पात्रा (मल) कादन जाळाव्यात व लगेच झाडावर कार्येन्डाझिम १ टक्के (१०१० रिकटर पाणी) फवारणी करावी. शिफारसीत संजिवके, किटकनाशके व बुरशीनाशके संशोधनाच्या आधारावर दिली आहेत, लेबल क्लेमनुसार नाहीत.
यावेळी यावेळी डॉ. राजेंद्र वानखडे, सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या, कु सोनल नागे, सहाय्यक प्राध्यापक, किटकशास्त्र व डॉ. प्रशांत मगरे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक (मृदशास्त्र), कृषि संशोधन केंद्र, अचलपूर तसेच डॉ. अजय गाठे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक (रोगशास्त्र), पानवेली संशोधन केंद्र दिवठाणा, एस.पी. दांडेगावकर मुख्य कार्यकारी अधिकारी, सिट्रस इस्टेट, चांदूरबाजार, किशोर वनवे, मंडळ कृषि अधिकारी, ब्राम्हणवाडा थडी, सिट्रस इस्टेट कार्यकारणी सदस्य उधवराव बंड, संतोष किटुकले, बी. प्रफुल नवघरे, पुष्पक खापरे आदीसंह कृषी सहाय्यक, परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.