Join us

Crop Management : भात, नागली, खुरासणी पिकासाठी कृषी सल्ला, असे करा व्यवस्थापन? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 7:12 PM

Crop Management : भात, नागली, खुरासणी ही पिके फुलोऱ्याच्या तसेच लोंबी वाढण्याच्या अवस्थेत आहेत, अशावेळी कसे व्यवस्थापन करावे, हे जाणून घेऊया...!

Paddy Crop Management : सध्या नाशिक जिल्ह्यातील (Nashik rain0 काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे. तर दुसरीकडे भात, नागली, खुरासणी ही पिके फुलोऱ्याच्या तसेच लोंबी वाढण्याच्या अवस्थेत आहेत, अशावेळी कसे व्यवस्थापन (crop Management) करावे, हे जाणून घेऊया...!

भात पीक : फुलोरा ते चिक भरण्याची अवस्था/लोंबी वाढीची अवस्था

  • सतत पडणाऱ्या पावसामुळे तसेच उष्ण व दमट वातावरणामुळे भात पिकावर मावाकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 
  • भात पिकावरील पिवळ्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील किंवा क्लोरोपायरीफॉस किवा इमिडाक्लोप्रिड १.५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • वेळेवर लागवड केलेल्या भात पीकात काढणीपूर्वी १० दिवस अगोदर पाण्याचा निचरा करावा. 
  • पीक निसवल्यावर साधारणपणे २५ ते ३० दिवसांनी ओबीतील ८० ते ९०% दाणे पक्व झाल्यावर भाताची कापणी करावी. 
  • वैभव विळ्याचा वापर यासाठी करावा. यामुळे खोड्‌कीडीचे नियंत्रण होते.
  • सतत पडणाऱ्या पावसामुळे तसेच उष्ण व दमट वातावरणामुळे भात पिकावर पिवळा खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 
  • म्हणून भात पिकावरील पिवळ्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • भात सदृश्य तणाची भेसळ फुलोऱ्यावर येताच लगेच काढावी. जेणेकरून त्याचे दाणे खडून इतर स्वच्छ भात प्रक्षेत्रावर होणारा प्रसार थांबवता येईल.
  • भात खाचरात लोंबी निर्मितीच्या अवस्थतेत १५ सेमी पाण्याची पातळी नियंत्रित ठेवावी.

 

नाचणी : फुलोरा ते चिक भरण्याची अवस्था

नाचणी पीक पावसाच्या पाण्यावर घेतले जाते. पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता पाहता उपलब्धतेनुसार संरक्षित पाणी द्यावे.नाचणी पिकातील भेसळ फुलोऱ्यावर येताच लगेच काढावी.

खुरासणी : फुलोऱ्याची अवस्था

जर खुरासणी पिक फुलोरा अवस्थेत असेल तर कीटकनाशकाची फवारणी करू नये. खुरासणी पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी, खुरासणी पिकात कीटक परागीभवन घडवण्याकरिता एक मधमाश्यांचे कृत्रिम पोळे प्रति एकरसाठी वापरण्याचे शिफारस करण्यात आली आहे.

- ग्रामीण मौसम कृषी सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनभातनाशिक