Lokmat Agro >स्मार्ट शेती > Crop Management : डाळिंब मर रोग नियंत्रणासाठी 'या' तीन पद्धती फायदेशीर, वाचा सविस्तर 

Crop Management : डाळिंब मर रोग नियंत्रणासाठी 'या' तीन पद्धती फायदेशीर, वाचा सविस्तर 

Latest News Crop Management three methods are beneficial for controlling Pomegranate die disease, read in detail  | Crop Management : डाळिंब मर रोग नियंत्रणासाठी 'या' तीन पद्धती फायदेशीर, वाचा सविस्तर 

Crop Management : डाळिंब मर रोग नियंत्रणासाठी 'या' तीन पद्धती फायदेशीर, वाचा सविस्तर 

Crop Management : बुरशी व किडींच्या नियंत्रणासाठी फळांच्या काढणीनंतर झाडे ताणावर असताना किंवा बहराच्या सुरुवातीच्या टप्प्यात खालीलपैकी एका पर्यायाने ड्रेचिंग करावे.

Crop Management : बुरशी व किडींच्या नियंत्रणासाठी फळांच्या काढणीनंतर झाडे ताणावर असताना किंवा बहराच्या सुरुवातीच्या टप्प्यात खालीलपैकी एका पर्यायाने ड्रेचिंग करावे.

शेअर :

Join us
Join usNext

Crop Management : डाळिंब बागेमध्ये सिरॅटोसिस्टिस, फ्युर्जेरिअम व फायटोप्थोरा या बुरशी आणि सूत्रकृमी, वाळवी, शॉट होल बोरर या किडींमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या बुरशी व किडींच्या नियंत्रणासाठी फळांच्या काढणीनंतर झाडे ताणावर असताना किंवा बहराच्या सुरुवातीच्या टप्प्यात खालीलपैकी एका पर्यायाने ड्रेचिंग करावे.

पहिली पद्धत

पहिली ड्रेचिंग प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) २ मि.लि. अधिक क्लोरपायरीफॉस २ मि.लि प्रति लिटर पाणी या प्रमाणे १० लिटर द्रावण प्रति झाड.
दुसरी ड्रेचिंग (पहिल्या ड्रेचिंगनंतर ३० दिवसांनी) अॅस्परजिलस नायजर (एएन-२७) ५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो प्रति झाड
तिसरी ड्रेचिंग (दुसऱ्या ड्रेचिंगनंतर ३० दिवसांनी) व्हॅम (व्हेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा रायझोफॅगस इरेग्यूलॅरिस / ग्लोमस इंट्राडॅलिसिस) २५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो . 

दुसरी पद्धत

प्रोपिकोनॅझोल (२५ ईसी) २ मि.लि अधिक क्लोरपायरीफॉस २ मि.लि प्रति लिटर पाणी याप्रमाणे २० दिवसांच्या अंतराने तीनवेळा ड्रेचिंग करावे.

तिसरी पद्धत

पहिली व तिसरी ड्रेचिंग - फोसेटील एएल (८० डब्ल्यूपी) ६ ग्रॅम प्रति १० लिटर द्रावण प्रति झाड दुसरी व चौथी ड्रेचिंग टेब्यूकोनॅझोल (२५९ ईसी) ३ मि.लि प्रति १० लिटर द्रावण प्रति झाड दोन डेचिगमध्ये २० दिवसांचे अंतर ठेवावे.


संकलन : कृषि सल्ला ग्रामिण कृषि मौसम सेवा, ए.एम.एफ.यु., इगतपुरी, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक.

Web Title: Latest News Crop Management three methods are beneficial for controlling Pomegranate die disease, read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.