Nashik : हल्ली अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकरी हैराण झाला आहे. मात्र तरीदेखील आपल्या कष्टाच्या बळावर शेतीत तग धरून आहे. यासाठी वेळोवेळी शेतीत बदल करणे आवश्यक ठरते. याच पार्श्वभूमीवर शासनाकडून वेगवगेळ्या योजना देखील राबवल्या जात आहेत. यातील एक म्हणजे महा रेशीम अभियान होय.
या अभियानातंर्गत रेशीम लागवडीसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना 3 लाख 97 हजार 335 रुपये अनुदानही मिळणार आहे. रेशीमसाठी तुतीच्या झाडाची लागवड केली जाते. तुती लागवडीसाठी महारेशीम अभियानांतर्गत शेतकऱ्यांना 1 लाख 86 हजार 186 रुपयांचे अनुदान दिले जात आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळावे, या दृष्टीने जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत गावोगावी महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. रेशीम लागवडीसाठी जिल्ह्यात रेशीम उत्पादनासाठी हजार एकर क्षेत्राचे लक्ष निर्धारित करण्यात आले. रेशीम लागवडीसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना 3 लाख 97 हजार 335 रुपये अनुदानही मिळणार आहे. रेशीमसाठी तुतीच्या झाडाची लागवड केली जाते. तुती लागवडीसाठी महारेशीम अभियानांतर्गत शेतकऱ्यांना 1 लाख 86 हजार 186 रुपयांचे अनुदान दिले जात आहे. यापूर्वी ही योजना जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत राबविण्यात येत होती. याची व्यापकता अधिक वाढावी, या दृष्टीने आता ही योजना जिल्हा परिषद, कृषी विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत राबविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
काय आहे महारेशीम अभियान?
रेशीम शेतीला चालना मिळावी तसेच रेशीम शेतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने महा रेशीम अभियान 2024 राबवले जात आहे. रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देऊन शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी प्रोत्साहित करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे. या रेशीम अभियानांमधून कीटक संगोपन गृहासाठी एक लाख 79 हजार 159 रुपयांचा अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रेशीम शेती करण्यासाठी लागणारी तर साहित्य खरेदीसाठी 32 हजार रुपये असे एकूण तीन लाख 97 हजार 335 रुपये अनुदान तीन वर्षांसाठी आहे. मजुरीसाठी ही दोन लाख 44 हजार रुपयांच्या अनुदान देण्यात येत आहे. हे सर्व प्रकारचे अनुदान तीन वर्षांकरिता असणार आहे.
देवगावमधील शेतकऱ्यांनी धरली रेशीम शेतीची कास, अनेक शेतकरी झाले लखपती
रेशीम विकास विभागाचे आवाहन
तुती रेशीम उत्पादनासाठी रेशीम उत्पादन प्रक्रियेत तीन प्राथमिक पायऱ्या असतात. मोरी कल्चर तुतीच्या पानांची लागवड रेशीम किड्यांचे संगोपन रेशीम किड्यांच्या वाढीस चालना देणे. रेशीम रेलिंग रेशीम किड्यांच्या कोकूनमधून रेशीम तंतू काढणे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे आठ महिने पाणीपुरवठा असेल अशा शेतकऱ्यांनी प्रति एकर 500 रुपये व आवश्यक ती कागदपत्रे जिल्हा रेशीम कार्यालयाकडे जमा करून नाव नोंदणी करावी लागणार आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात यंदा अनेक वर्षानंतर पर्जन्यमान कमी झाले आहे. एकाच पिकावर अवलंबून न राहता शेती आधारित व्यवसाय करावा. रेशीम कोषाला भाव चांगला असल्याने रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन रेशीम विकास विभागाने केले आहे.