Pomegranate Crop Management : डाळींबाच्या झाडास (Pomegranate Farming) आंबिया बहार, मृग बहार, हस्तबहार असे तीन बहार येतात. यापैकी कोणत्याही एका बहाराची फळे घेणे फायदेशीर असते. आंबिया बहार (Ambiya Bahar) धरणे अधिक चांगले कारण फळांची वाढ होताना व फळे तयार होताना हवा उष्ण व कोरडी राहते. त्यामुळे फळास गोडी येते. दरम्यान जानेवारी आणि फेब्रुवारी हा काळ बहार येण्याचा काळ असतो. या काळात डाळींब पिकाची काळजी कशी घ्यावी, हे समजून घेऊया....
कीड व्यवस्थापन :
नवीन पालवी फुटण्याची अवस्थापहिले पाणी दिल्यानंतर १० ते १५ दिवसांनी निळे किंवा पिवळे चिकट सापळे २५ ते ३० सापळे प्रती एकर याप्रमाणे झाडाच्या सर्वात उंच फांदीपासून १० ते १५ सें.मी. खाली बांधावे. हे सापळे चिकटलेल्या किडीनुसार २० ते २५ दिवसांनी बदलावेत.
वाढीची अवस्थाअॅझाडिरॅक्टिन / कडुनिंब तेल १% (१०,००० पीपीएम) ३ मिली किंवा करंज तेल ३ मिली किंवा वरील दोन्ही तेलांचे मिश्रण प्रत्येकी ३ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आवश्यकतेनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने एक-दोन फवारण्या घ्याव्यात.
फुलधारणा / फुलकळी येण्याची अवस्था७ ते १० दिवसांच्या अंतराने सायअँट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) ०.९ मिली किवा क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिली किंवा फ्लुबेन्डीॲमाइड अधिक थायक्लोप्रिड (४८० एससी) ०.५ मिली अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मिली लिटर पाणी याप्रमाणे एक-दोन फवारण्या घ्याव्यात.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी