Lokmat Agro >स्मार्ट शेती > Draksh Bag Management : रिकटनंतर द्राक्ष बागेतील व्यवस्थापन 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Draksh Bag Management : रिकटनंतर द्राक्ष बागेतील व्यवस्थापन 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Latest News Draksh Bag Management Keep these things in mind when managing grape farm after pruning, read in detail | Draksh Bag Management : रिकटनंतर द्राक्ष बागेतील व्यवस्थापन 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Draksh Bag Management : रिकटनंतर द्राक्ष बागेतील व्यवस्थापन 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Draksh Bag Management : दरम्यान रिकट केल्यानंतर या बागेतील व्यवस्थापन (Draksh Bag Management) कसे करावे, हे या लेखातून समजून घेऊया.... 

Draksh Bag Management : दरम्यान रिकट केल्यानंतर या बागेतील व्यवस्थापन (Draksh Bag Management) कसे करावे, हे या लेखातून समजून घेऊया.... 

शेअर :

Join us
Join usNext

Draksh Bag Management : नवीन द्राक्ष बागेत (Grape Viniyard) रिकट घेण्यापूर्वीची तयारीबाबतची माहिती घेतली. यानंतर द्राक्ष बागेची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे रिकटचा काळ अतिशय महत्वाचा मानला जातो. दरम्यान रिकट केल्यानंतर या बागेतील व्यवस्थापन (Draksh Bag Management) कसे करावे, हे या लेखातून समजून घेऊया.... 

रिकट बागेतील व्यवस्थापन

  • नुकताच रिकट झालेल्या बागेत वाढत्या तापमानात डोळे लवकर फुटायला सुरुवात होईल. 
  • यापूर्वी रिकट घेतल्यानंतर चार ते ते पाच डोळ्यांना पेस्टिंग केले असेल असेल. 
  • आता सर्वच फुटी निघालेल्या असतील. यावेळी आपल्याला फक्त दोन फुटींची गरज आहे. 
  • सात ते आठ पानांच्या अवस्थेत निघालेल्या फुटींपैकी वरच्या फुटींला चार पानांवर शेंडा मारून घ्यावा. 
  • खालील फूट सुतळीने बांधून घ्यावी. 
  • शेंड्याचे प्रभुत्व (अपायकल डॉमिनन्स) या द्राक्ष जातीमध्ये जास्त असल्यामुळे पहिली फूट जोरात चालत असल्यास दुसरी फूट हळूहळू वाढेल. 
  • वरील फुटीमध्ये रिकट घेतल्यानंतर शेंड्याकडील काडीवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. 
  • त्यामुळे पहिल्या फुटीवर शेंडा पिंचिंग करून खालील फूट खोड तयार करण्याकरिता बांबूला सुतळीने बांधून घ्यावी. 
  • वरच्या फुटीचा शेंडा मारल्यामुळे दुसरी फूट जोरात चालेल. 
  • खोड तयार करण्याकरिता या फुटीची वाढ लवकर होणे व जाडी मिळणे गरजेचे असते. 
  • यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन जास्त महत्त्वाचे आहे. 
  • खोड तयार झाल्यानंतर अन्नद्रव्यांचा साठा व्यवस्थित व्हावा, यासाठी नत्र आणि स्फुरदयुक्त खतांचा वापर केला जातो. 
  • यामध्ये १२-६१-०, युरिया किंवा अमोनिअम सल्फेटचा वापर करता येईल, दोन पेऱ्यांतील अंतर वाढण्याकरिता फक्त नत्राचा वापर करून चालणार नाही, तर पाणी व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे आहे. 
  • नुकतेच तयार केलेले बोद वाफसा स्थितीत असतील. 
  • तसेच मुळांच्या कक्षेत पुरेसे पाणी असल्यास अन्नद्रव्यांचा पुरवठा शक्य होईल.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Draksh Bag Management Keep these things in mind when managing grape farm after pruning, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.