Lokmat Agro >स्मार्ट शेती > Grape Harvesting : द्राक्षांची काढणी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या सविस्तर 

Grape Harvesting : द्राक्षांची काढणी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या सविस्तर 

Latest news draksh kadhani Take care of 'these' things while harvesting grapes, know in detail | Grape Harvesting : द्राक्षांची काढणी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या सविस्तर 

Grape Harvesting : द्राक्षांची काढणी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या सविस्तर 

Grape Harvesting : सद्यस्थितीत द्राक्ष काढणी (Grape Harvesting) जोरात सुरु असून अशावेळी द्राक्ष काढणीची तयारी कशी करावी हे जाणून घेऊयात....

Grape Harvesting : सद्यस्थितीत द्राक्ष काढणी (Grape Harvesting) जोरात सुरु असून अशावेळी द्राक्ष काढणीची तयारी कशी करावी हे जाणून घेऊयात....

शेअर :

Join us
Join usNext

Grape Harvesting : द्राक्ष काढणी (Draksh Kadhani) ही द्राक्ष उत्पादकांसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. द्राक्षांची काढणी करताना कापणीचा हंगाम, कापणीची पद्धत, आणि कापणीचे साधन या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सद्यस्थितीत द्राक्ष काढणी (Grape Harvesting) जोरात सुरु असून अशावेळी द्राक्ष काढणीची तयारी कशी करावी हे जाणून घेऊयात.... 


फळकाढणीची तयारी

  • वाढत्या तापमानात फळकाढणी करणे म्हणजे मण्याची प्रत बिघडविणे होय. 
  • काढणीनंतर द्राक्षाची निर्यात किंवा स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्याचे नियोजन करताना द्राक्षमण्यांची प्रत टिकून राहणे अत्यंत आवश्यक असते.
  • द्राक्षमण्यातील तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असलेली अवस्था म्हणजेच 'फळकाढणीचा कालावधी होय. 
  • ही परिस्थिती साधारणतः सकाळी ११ ते ११.३० काढलेल्या द्राक्ष फळांमध्ये दिसून येईल. 
  • यावेळी मण्यातून पाणी निघून जाण्याची शक्यता कमी असते. 
  • द्राक्ष फळांची प्रत टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने द्राक्षघडाची हाताळणीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. 
  • फळकाढणी करताना हातमोजांचा वापर, द्राक्षघड क्रेटमध्ये एकामेकांवर पडणार नाहीत अशा प्रकारे ठेवणे म्हणजेच फळांची हाताळणी होय, घडाच्या मण्यावर कोणतीही इजा होऊ नये, याकरिता क्रेटच्या तळामध्ये कुशनिंग करणे गरजेचे आहे. 
  • कुशनिंगकरिता बबलशीटचा वापर करावा, फळकाढणी झाल्यानंतर त्वरित द्राक्षघड सावलीत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 
  • फळ काढणीच्या एक ते दोन दिवस आधी घडातील सुकलेले मणी, तडे गेलेले मणी, करप्याचे डाग असलेले मणी काढून घ्यावेत. 
  • जेणेकरून फळकाढणीच्या वेळी चांगल्या प्रतिची द्राक्ष उपलब्ध होतील.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 
 

Web Title: Latest news draksh kadhani Take care of 'these' things while harvesting grapes, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.