Lokmat Agro >स्मार्ट शेती > Agriculture News : रानडुकरांच्या दहशतीपासून, पिकांच्या संरक्षणासाठी हे जबरदस्त उपाय कराचं, वाचा सविस्तर 

Agriculture News : रानडुकरांच्या दहशतीपासून, पिकांच्या संरक्षणासाठी हे जबरदस्त उपाय कराचं, वाचा सविस्तर 

Latest News Follow these seven measures to protect crops from wild boars, read in detail | Agriculture News : रानडुकरांच्या दहशतीपासून, पिकांच्या संरक्षणासाठी हे जबरदस्त उपाय कराचं, वाचा सविस्तर 

Agriculture News : रानडुकरांच्या दहशतीपासून, पिकांच्या संरक्षणासाठी हे जबरदस्त उपाय कराचं, वाचा सविस्तर 

Agriculture News : रानडुकरांना पळवून लावण्यासाठी, पिकांच्या संरक्षणासाठी कोणते उपाय आहेत, ते पाहुयात.... 

Agriculture News : रानडुकरांना पळवून लावण्यासाठी, पिकांच्या संरक्षणासाठी कोणते उपाय आहेत, ते पाहुयात.... 

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : सध्या लागवडीचा काळ असून अनेक भागात पिकांनी जमिनीतून माना वर काढल्या आहेत. या दिवसात तसेच इतर वेळी डुकरांचा हैदोस पाहायला मिळतो. उभ्या पिकात डुकरे हिंडत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होते. अशावेळी  हे उपाय नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. पिकांच्या संरक्षणासाठी नेमके उपाय आहेत, ते पाहुयात.... 

* पारंपारिक पद्धती 

स्थानिक डुकरांच्या शेणाचा वापर
स्थानिक डुकरांच्या शेणापासून तयार केलेले द्रावण पिकांच्या सभोवताली एक फुट अंतरावर टाकून मातीत मिसळणे. त्यामुळे रानडुकरांना त्या शेणाचा वास येऊन दुसरेच रानडुक्कर शेतात प्रवेश करत आहेत असे वाटते. व रानडुक्कर शेतात घुसणार नाहीत. दर सात दिवसाच्या अंतराने असे केल्यास रानडुकरांपासून नुकसान कमी होते.

श्वसन निवारक म्हणून मानवी केसांचा वापर
असमाधानकारक विकसित दुपटी असल्याने वन्य डुक्कर हालचाली करण्याकरता ते नाक जमिनीवर घासून इंद्रियांद्वारा वास घेत आपला मार्ग शोधत असतात. त्यामुळे बरेच शेतकरी मानवी केसांचा वापर रानडुकरांची दिशाभूल करण्यासाठी वापरतात. ही एक कमी खर्चाची पारंपरिक पद्धत आहे. रानडुक्कर आपले नाक जमिनीवर गाजते व मानवी केस नाकात गेल्यामुळे वन्य डुक्कर चिडतात आणि मोठ्याने आवाज करतात. त्यामुळे इतर रानडुकरांना सुद्धा धोक्याचे संदेश जातो. व ते पिकाकडे येत नाहीत यामुळे 70 ते 80 टक्के नुकसान ठरते. 

स्थानिक डुकरांच्या गौऱ्या जाळणे : स्थानिक डुकरांचे वाळलेले शेण एका मातीच्या भांड्यात घेऊन जाळावे व चार-पाच ठिकाणी धूर करावा. त्या धुराच्या वासाने रानडुक्कर स्थानिक डुकरांचे कार्यक्षेत्र आहे, असे समजून पाहून जातात.

ड्रम वाजवणे/ फटाके फोडणे : हा उपाय सामुदायिक रित्या केल्यास जास्त परिणामकारक दिसतो. आवाज करणे, घंटा वाजवणे, फटाके वाजवणे, आरोळ्या देणे, इत्यादी प्रयत्न करून नुकसान कमी करता येते. ऑटोमॅटिक घड्याळे पण येतात, ते लावूनही सतत आवाज करता येतो.

स्थानिक कुत्र्यांचा वापर : स्थानिक कुत्रे पाळून त्यांना शिकवुन डुकरांना पळून लावण्यासाठी वापर केला जातो. ही पद्धत देखील शाश्वत आहे.

* पर्यावरण पूरक उपचार

जैविक कुंपण यांचा वापर
जसे की घायपात, करवंद, काटेरी, निवडुंग, झुडपे, तुती लागवड, बोर वापरून संरक्षणात्मक वापर करता येतो.
भुईमूग पिकात सीमा पीक म्हणून करडईच्या 2-3 लाईन टाकल्यास दाट पेरा केल्यास त्याचा उग्र वास व काटेरी पानांमुळे आज प्रवेश करण्यास अडचण निर्माण होते. मका पिका भोवती एरंडीच्या दोन रांगा दाट लावल्यास रानडुक्कर मका वासानुसार ओळखतात. एरंडीच्या पानात अल्कोलाईट व ग्लुकोसाइड उच्च मात्र असल्यामुळे मका पीक ओळखू शकत नाही. शिवाय एरंडी उत्पादनाचाही फायदा मिळतो.

अंड्यांची फवारणी करणे  : वन्य डुक्कर वासाने पीक ओळखतो. त्यामुळे 20 मिली लिटर पाणी मिसळून पिकाच्या सभोवताली अंडी रस दोन ओळीवर अथवा मातीवर फवारणी केल्यास नैसर्गिक गंध निर्माण होतो. डुकरे परावर्तित होतात. 

काटेरी तारेचे कुंपण : शेतामध्ये तीन रांगेत काटेरी तारांच्या करावे जमिनीपासून एक फूट उंचीवर पहिली लाईन घ्यावी. दुसरी दीड फूट व तिसरी दोन फूट अशी चार ते पाच फूट उंचीमुळे रान डुक्कर व इतर जनावरांपासून सुद्धा संरक्षण होते. ही खर्चिक पण कायमशिवाय प्रभावी पद्धत आहे. लोखंडी बाहेरच्या गोल कड्या पण करता येतात.


सौर विजेचे कुंपण : ही पद्धत हल्लीच्या काळात लोकप्रिय होत आहे. ही कायमची व्यवस्था आहे. सौर कुंपणात 12 वोल्ट वीज निश्चित ठेवण्यात येते. वीज पॅनल बसून तारात पाठवली जाते. या तारेला स्पर्श केल्यास शॉक बसतो. परंतु प्राणी हत्या घेत होत नाही व प्राणी येणे नक्कीच बंद होते. घाबरून इतरही प्राणी येत नाही.

खड्डा पद्धत : पिकाच्या शेता भोवताली 2 1/2 फूट रुंद व दोन फूट खोल खड्डा घेतल्यास डुक्कर व इतर प्राणीही आत येऊ शकत नाही, नुकसान टळते. तसेच या माध्यमातून जलसंधारणाचे काम होते. जमिनीही चिवड होत नाही. दर दोन-तीन वर्षानंतर दुरुस्ती घ्यावी लागते.

इतर अन्य उपाय

थिमेट फॉरेस्ट दाणेदार कीड नाशकाचा वापर
पॉलिथिन बॅगला दोन-तीन छिद्र करून 200 ग्रॅम थिमेट अधिक एक किलो रेती मिश्रित करून दोन-तीन ठिकाणी शेताच्या धुऱ्याकडे ठेवावा. असे शेताच्या सर्व बाजूने करावे. वाऱ्याच्या झोताने थिमेटचा उग्रवास जातो व रानडुकराला हा वास सहन होणार नाही.

नारळ दोरी : गंधक अधिक डुक्कर तेल मिश्रणात नारळ दोरी मिसळून लावल्यास उग्र वास येतो दहा दिवसांनी परत बुडवावे.  तसेच शेती भोवताली (केळी, द्राक्ष),  पिकांच्या सभोवताली रंगीत साड्या बांधल्यास डुकरांना भीती निर्माण होते, मात्र हा खर्चिक उपाय आहे. शिवाय रिफ्लेक्टिव्ह रिबन लावल्यास हवेने डोळ्यांवर प्रकाश येतो व पट्ट्या आवाजही करतात.

संकलन : डॉ. पी. एस. जोशी, सेवानिवृत्त सहाय्यक संचालक, रामेती, छत्रपती संभाजीनगर

Web Title: Latest News Follow these seven measures to protect crops from wild boars, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.