Join us

Fruit Crop Management : फळझाडांवरील कीड आणि रोगांचे नियंत्रण, कसे कराल व्यवस्थापन? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 7:50 PM

Fruit Crop Management : सध्या फळझाडांवर अनेक कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे, अशावेळी काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊ.

Fruit Crop Management : सद्यस्थितीत फळ पिकांवरील फळे पोखरणाऱ्या अळ्या, पाने खाणाऱ्या भुंगेरे, पेरूवर देवी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. अशावेळी नेमकी काय काळजी घ्यावी, हे या लेखातून समजून घेऊया.

डाळिंब१) पिकावरील फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी गळलेली फळे वेचून आतील अळीसह नष्ट करावीत.२) २ ग्रॅम कार्बारील (५०%) प्रति लिटर पाण्यातून डाळिंब पिकावर फवारावे.३) पानांवरील/फळांवरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेंडेंझिम १० ग्रॅम + मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.४) डाळिंबावरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेंडेंझिम १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून त्याची खोडाभोवती आळवणी करावी.

आवळा१) आवळा पिकावरील पाने खाणाऱ्या भुंगेरेच्या नियंत्रणासाठी ५०% कार्बरील २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.२) भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी  ३०० मेश गंधकाची भुकटी २० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात धुरळावी.३) रोपाभोवती ३० ग्रॅम कॉपरऑक्सिक्लोराइड प्रति दहा लिटर पाणी द्रावण ओतावे. तसेच रोपावर १० मि.ली. ऑक्सिडिमेटॅान मिथाईल + २५ ग्रॅम मॅन्कोझेब प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे.४) आवळा पिकावरील भुरी, करपा रोग आणि किडे यांच्या नियंत्रणासाठी १४ मि.ली. ऑक्सिडिमेटॅान मिथाईल + ५ मि.ली. डिनोकॅप प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. 

पेरू१) पेरुवरील देवी रोगाच्या नियंत्रणासाठी झाडावर कॉपर ऑक्सिक्‍लोराईड १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम या प्रमाणात दहा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.२) रोगट फळे काढून नष्ट करावीत.३) फळमाशीच्या नियंत्रणासाठी ५०% कार्बारिल २० ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन वेळा फवारावे.  तसेच स्टेप्टोमायसीन ९ ग्रॅम + ऑक्सिडिमेटॅान  मिथाईल १५ मि.ली. दहा लिटर पाण्यातून फवारावे, दुसरी फवारणी १५ ते २० दिवसाच्या अंतराने करावी.४) त्याचप्रमाणे कॉपरऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम + डायमेथोएट १० मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारावे.

संकलनडॉ. कल्याण देवळाणकरसेवानिवृत्त शास्रज्ञ, कृषी विद्यापीठ 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीडाळिंबपीक व्यवस्थापन