Lokmat Agro >स्मार्ट शेती > Gahu, Jwari Crop : ज्वारी अन् गहू पिकाची दाणे भरण्याची अवस्था, अशी घ्या काळजी, वाचा सविस्तर 

Gahu, Jwari Crop : ज्वारी अन् गहू पिकाची दाणे भरण्याची अवस्था, अशी घ्या काळजी, वाचा सविस्तर 

Latest News Gahu, Jwari Crop management Grain filling stage of jowar and wheat crop read in detail | Gahu, Jwari Crop : ज्वारी अन् गहू पिकाची दाणे भरण्याची अवस्था, अशी घ्या काळजी, वाचा सविस्तर 

Gahu, Jwari Crop : ज्वारी अन् गहू पिकाची दाणे भरण्याची अवस्था, अशी घ्या काळजी, वाचा सविस्तर 

Gahu, Jwari Crop : रब्बी ज्वारी कणसांमध्ये दाणे भरणे (Jwari Crop Management) तर गहू (Wheat Farming) लोंब्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत.

Gahu, Jwari Crop : रब्बी ज्वारी कणसांमध्ये दाणे भरणे (Jwari Crop Management) तर गहू (Wheat Farming) लोंब्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Gahu, Jwari Crop :  सध्या रब्बी ज्वारी कणसांमध्ये दाणे भरणे (Jwari Crop Management) आणि पक्वतेच्या अवस्थेमध्ये आहेत. तर गहू लोंब्या लागणे (Wheat Farming) आणि लोंब्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. अशावेळी या दोन्ही पिकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी यांच्या वतीने सामान्य सल्ला देण्यात आला आहे. 

रब्बी ज्वारी पिकासाठी ... 

  • ज्वारी पिकाच्या फुलोरा ते दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत कणसातील अळ्या या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. 
  • तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास झाड वाळते. अळ्या दुधाळ अवस्थेतील दाणे खातात. 
  • विष्ठेमुळे दाण्याची प्रत खराब होते. 
  • म्हणून २० अळ्या प्रति कणीस आढळल्यास, नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी २ मिली प्रति लिटर पाणी मिसळून याप्रमाणे फवारणी करावी.
  • ज्वारीचे पीक जातीपरीत्वे ११० ते १३० दिवसांत काढणीस तयार होते. 
  • ज्वारीच्या दाण्याच्या टोकाजवळ काळा ठीपक्याचे लक्षणे दिसताच ज्वारीची काढणी करावी व ८ ते १० दिवस कणसे उन्हात वाळवून मळणी करावी.

गहू पिकासाठी ... 

  • गहू ओंबीवर आल्यावर उंदीर नासाडी करतात. 
  • उंदरांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास ३ ते २१ टक्क्यांपर्यंत गव्हाचे नुकसान होते. 
  • उंदराच्या नियंत्रणासाठी विषारी अमिषांचा वापर करावा. 
  • आमिष तयार करण्याकरिता कोणत्याही धान्याचा जाडाभरडा ५० भाग त्यात एक भाग झिंक फॉस्फाईड मिसळावे. 
  • यामध्ये थोडेसे गोडेतेल टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करून प्रत्येक बिळामध्ये साधारणपणे एक चमचा मिश्रण काठीच्या सहाय्याने खोलवर टाकावे. 
  • बिळे पालापाचोळा वा गवत टाकून झाकून घ्यावीत व बिळांची तोंडे चिखलाने बंद करावीत. तसेच पिंजऱ्याचा उपयोग करून उंदीर पकडावेत.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Gahu, Jwari Crop management Grain filling stage of jowar and wheat crop read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.