Join us

Gahu Khat Vyasthapan : गव्हाच्या अधिक उत्पादनांसाठी खत व्यवस्थापन समजून घ्या, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:03 IST

Wheat Crop Management : गहू पिकासाठी खत व्यवस्थापन कसे करावे, (How to manage fertilizer for wheat crop) हे सविस्तर जाणून घेऊयात.... 

Wheat Crop Management : महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी (Wheat Crop) हंगामातील एक महत्वाचे पीक आहे. खरीप हंगामात पाऊस लांबल्यामुळे खरीपाची पिके काढणीस वेळ होतो. तसेच काही क्षेत्रावर ऊसतोडणीनंतर, कापसाचे पीक काढल्यानंतर किंवा मका काढणीनंतर पिकांच्या काढणीस उशीर झाल्याने शेतक-यांना गव्हाची उशिरा पेरणी करावी लागते. गहू पिकासाठी खत व्यवस्थापन कसे करावे, (How to manage fertilizer for wheat crop) हे सविस्तर जाणून घेऊयात.... 

खते व्यवस्थापन (प्रति एकर अन्नद्रव्ये मात्रा)गव्हाच्या पिकासाठी एकरी ४ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत दयावे. शेणखत/ कंपोस्ट उपलब्ध साल्यास गांडूळ खत/ अखाद्य पेंड/कोंबडी खत किंवा इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा,

 

महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी गहु पिकास पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसानंतर पिकावर २०० ग्रॅम १९:१९:१९ या विद्राव्य खताची १० लि. पाण्यात मिसळून दोन फवारण्या कराव्या.

जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत गहू पिकात एकरी ८ किलो झिंक सल्फेट शेणखतात एक आठवडा मुरवून (११० प्रमाणात) पेरणीच्या वेळेस जमिनीतून द्यावे. लोहाची कमतरता असलेल्या जमिनीत गहू पिकास एकरी ८ किलो फेरस सल्फेट (हिराकस) आठवडाभर शेणखतात मुरवुन (१:१० प्रमाणात) पेरणीच्या वेळेस जमिनीतून द्यावे..

- डॉ. योगेश पाटील,  डॉ. भानुदास गमे  आणि प्रा. भालचंद्र म्हस्के  जिल्हा विस्तार केंद्र, कृषि संशोधन केंद्र, निफाड- जिल्हा-नाशिक

 

टॅग्स :गहूरब्बी हंगामशेती क्षेत्रपीक व्यवस्थापन