Join us

Gatai Stall Yojana : छोटा व्यवसाय सुरु करायचाय? गटई स्टॉल योजना आहे ना! वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 19:28 IST

Gatai Stall Yojana : गटई स्टॉल योजनेसाठी अर्ज भरण्याची ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे.

Gatai Stall Yojana : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील बांधवांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी गटई स्टॉल योजनेची (Gatai Stall Yojana) सुरुवात केली आहे. योजनेसाठी अर्ज भरण्याची ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे.

अर्ज विनामूल्य प्राप्त करून घ्यावा

या व्यवसाय योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरजू अर्जदारांनी विहित नमुना अर्ज समाजकल्याण कार्यालयातुन प्राप्त करून घ्यावा. त्यासह अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल, ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महापालिका यांनी त्यास भाड्याने, करारनाम्याने, खरेदीने अगर मोफत, परंतु अधिकृतरीत्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वमालकीची असावी.

इतके हवे उत्पन्न

अनुसूचित जातीच्या गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्यात येणार आहे. हे स्टॉल मिळण्याकरिता अर्जदाराने अर्ज सादर करावा, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि अनुसूचित जातीचा असावा, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी ४० हजार रुपये आणि शहरी भागासाठी ५० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. तसेच अर्जदाराचे वय १८ वर्षे ते ५० वर्षापर्यंत असावे. 

ही आहेत आवश्यक कागदपत्रेओळखपत्र : आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पासपोर्ट. रहिवासी दाखला : रेशन कार्ड, आधार कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल मोबाइल नंबर, ई-मेल आयडी अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला अपंग असेल तर अपंग प्रमाणपत्र, बँक पासबुक. 

येथे करा अर्जया योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळच्या जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जाऊन गटई स्टॉल योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.

Solar Pump Vendor : सोलर पंप योजना पुरवठादार किंवा वेंडरची यादी कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रशेतीसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय