Join us

Grape Crop Management : द्राक्ष बागेतील काडी परीपक्वतेसाठी काय उपाययोजना कराल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 5:02 PM

Grape Crop Management : कारण फळछाटणीसाठी काडीची परिपक्वता असणे अनिवार्य असते, ही परिपक्वतेची समस्या आल्यास काय करावे, हे समजून घेऊया.... 

Grape Crop Management : सद्यस्थितीत द्राक्षबागेतील (Grape Crop) काडी परिपक्वतेचा कालावधी सुरु आहे. यानंतर फळछाटणीला सुरवात होते, ती ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला. तत्पूर्वी द्राक्षेतील काडीची परिपक्वता होणे आवश्यक असते. या पायरीवर अनेकदा काडी परिपक्वतेच्या समस्येला तोंड द्यावे लागते. कारण फळछाटणीसाठी काडीची परिपक्वता असणे अनिवार्य असते, ही परिपक्वतेची समस्या आल्यास काय करावे, हे समजून घेऊया.... 

सध्याच्या कालावधीमध्ये बागा काडी परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात असतील. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खरडछाटणी झालेल्या बागेत यावेळी काडी परिपक्व होऊन वेलीचा या शेवटच्या टप्प्यातील विश्रांतीचा कालावधी मानला जातो. या बागेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात फळछाटणी सुरुवात होणे अपेक्षित आहे. यासाठी काडी परिपक्वता पूर्ण झालेली असावी. 

काडी परिपक्वतेकरिता पुढील उपाययोजना

  • बागेत पाणी पूर्णपणे बंद करणे.
  • पालाशयुक्त खतांचा वापर ठिबकद्वारे (१ ते १.२५ किलो /एकर /दिवस) आणि फवारणीद्वारे (४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे) करणे.
  • ठिबकद्वारे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये खते द्यावीत. ड्रीपर कमीत कमी वेळ चालू राहील, असे पाहावे. 
  • शेंडा पिंचिंग करणे महत्त्वाचे असेल.
  • बगलफुटी निघालेल्या असल्यास त्या त्वरित काढून घ्याव्यात. फुटी काडीवर मोकळ्या राहतील, असे नियोजन करावे असे केल्यास काडीवर पुरेसा सूर्यप्रकाश पडून त्यात लिग्नीन तयार होण्यास मदत होईल. 

 

संकलन :  ग्रामीण कृषि मौसम विभाग वेधशाळा विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक.

टॅग्स :द्राक्षेशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन