Grape Farming : साधारणतः किमान तापमान १५ अंशांवर असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होते. बागेतील तापमान यापेक्षा कमी झाल्यास मण्याचा आकार थांबलेला दिसतो. वेळ वाया जाऊ नये आणि मण्याचा (Draksh Mani) आकार त्वरित वाढण्याच्या उद्देशाने बागायतदार संजीवकांचा (Grape farmer) शिफारशीत मात्रेपेक्षा अधिक वापर करतात. बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या टॉनिक्सचा वापरही केला जातो.
याच्या अतिरेकामुळे घडामध्ये सायटोकायनीनची मात्रा गरजेपेक्षा जास्त वाढते. या अवस्थेत शेंडा वाढलेला असतो. पानेही अर्थ परिपक्व झालेली असतात. त्यामुळे या भागातील वाढ होण्याची शक्यता कमी असते. परिणामी, विकास होत असलेल्या द्राक्षघडावर दाब निर्माण होतो. त्यामुळे घडाच्या दांड्यावर किंवा देठावर गाठी येताना दिसून येतात. काही परिस्थितीत खोड किंवा परिपक्व काडी चिरलेली दिसते. त्यामधून मुळे निघताना दिसून येतात.
संजीवकांमध्ये काही प्रमाणात तणनाशकांची मात्रा असल्याससुद्धा आपण घेतलेल्या जास्त फवारणीमुळे विपरीत परिणाम दिसू लागतात. घडावर एकदा गाठ आल्यास पुढील काळात ती फुगत जाते. त्या गाठीच्या आतील भागात पोकळी निर्माण होऊन त्यामध्ये पांढरा द्रव दिसतो. यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा खंडित होऊन त्या ठिकाणी घड मोडतो. या घडात साखर उतरत नाही.
- उपाययोजना
- नुकत्याच गाठी सुरू होत असलेल्या परिस्थितीत बागेत नत्र वाढवावे. उदा. युरिया एकरी ०.७५ ते १ किलो पाच-सहा
- दिवस किंवा १२-६१-० ०.१ किलो पाच-सहा दिवस द्यावा.
- संजीवकांच्या वापराचा अतिरेक टाळावा.
- पाण्याची मात्रा काही दिवसांसाठी वाढवून, शेंड्याकडील दोन-तीन पाने वाढवून घ्यावीत.
- काही दिवसांकरिता बगलफुटी काढणे किंवा शेंडा पिंचिंग करणे टाळावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी सेवा केंद्र, इगतपुरी