Join us

Crop Management : कुठल्या पिकासाठी कुठलं तणनाशक प्रभावी, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 4:04 PM

Crop Management : तणांचे पीक व तणे उगवण्यापूर्वी रासायनिक पद्धतीने नियंत्रण कसे करावे, हे समजून घेऊया! 

Crop Management : खरीप पिकांची (Kharif Crops) लागवड जोरात सुरू झाली असून अशा स्थितीत शेतांमध्ये तण वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच खरीप हंगामातील ज्वारी बाजरी मका, तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन पिकात काही विशिष्ट तणांचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येते. या तणांचे पीक व तणे उगवण्यापूर्वी रासायनिक पद्धतीने (Weed Control) नियंत्रण कसे करावे, हे समजून घेऊया! 

साधारण सर्व प्रकारच्या नियंत्रणासाठी बस्ता नावाचे तणनाशक प्रभावी ठरते. हे तणनाशक १५ टक्के एसएल, हेक्टरी ३. ३ मिली., ५०० लिटर पाण्यात उगवणीनंतर फवारावे. त्यानंतर लव्हाळा, रुंद पानांची तणे ही प्रामुख्याने भात शेतात उगवून येतात. यासाठी साथी हे तण नाशक (Weed killer) वापरावे. त्याचे प्रमाण १० टक्के  डब्ल्यूपी, हेक्टरी प्रमाण २०० ग्रॅम, साधारण ५०० लिटर पाण्यात लावणीनंतर २० ते २५ दिवसांनी वापरण्यात यावे. 

मका पिकातील लव्हाळा गवताच्या नियंत्रणासाठी लॉडीस नावाचे तणनाशक वापरावे. यात ३४.४ एससी इतके क्रियाशील घटक असतात. हेक्टरी प्रमाण २८५ मिली, साधारण ५०० लिटर पाण्यात लावणीनंतर १८-१९ दिवसांनी वापरण्यात यावे. तर हंगामी गवतवर्गीय व काही रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी टिंजर नावाचे ३३.६ एससी इतके क्रियाशील घटक तणनाशक असणारे ७५ ग्रॅम, ३७५ मिली पाण्यातून पेरणीनंतर १८-२५ दिवसांनी फवारावे.

सोयाबीन : सोयाबीन पिकातील लव्हाळा व काही गवतवर्गीय रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी व्हीप सुपर ट्रान्स ८०० ग्राम अधिक ३० ग्रॅम, ५०० ली. पाण्यातून २० दिवसांनी फवारावे. त्याचबरोबर शकेद नावाचे तणनाशक २.५ टक्के अधिक ३.७५, २ ली, ५०० लिटर पाण्यातून १८ तें २२ दिवसांनी फवारावे. तसेच आयरिश नावाचे तणनाशक क्रियाशील घटक १६. ५ , हेक्टरी प्रमाण १. लिटर ५०० ली. पाण्यातून  १८ तें २२ दिवसांनी फवारावे.

सोयाबीन, कापूस, भुईमूग व उडीद- या पिकातील गवतवर्गीय व रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी टर्मा सुपर तणनाशक, ५% इसी, हेक्टरी प्रमाण १ मिली, ५०० लिटर पाण्यातून १५ ते २० दिवसांनी द्यावे. सोयाबीन, भुईमूग पिकातील गवतवर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी ड्युअल ५०% इसी, हेक्टरी प्रमाण २-३ लिटर ३ दिवसांनी ५०० लिटर पाण्यातून फवारावे. ऊस भात पिकातील लव्हाळा रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी अलग्रिप तणनाशक वापरावे, यात क्रियाशील घटक २० डब्ल्यू पी, हेक्टरी प्रमाण  ४ ग्रॅम, लागवणीनंतर ३० दिवसांनी ५०० लिटर पाण्यातून फवारावे.

लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .

टॅग्स :पीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेतीखते