Join us

Honey Bee Home : एकच उपाय अनेक फायदे, मधमाशांसाठी मधुशीतगृह म्हणजेच विटांचं घर, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:11 IST

Honey Bee Home : नाशिक कृषि विज्ञान केंद्राच्या (Krushi Vidnyan Kendra Nashik) अंतर्गत मधमाशांसाठी पर्यावरणपूरक ‘मधुशीतगृह’ तयार केले आहे.

Honey Bee Home :  सतत बदलत चाललेल्या पर्यावरणीय परिस्थितींमुळे पाळीव मधमाशांच्या (Honey Bees) वसाहतींना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. उन्हाळ्यातील (Temperature) प्रखर उष्णता आणि वाढती तापमान पातळी यामुळे मधमाशांच्या संवर्धनासाठी नवनवीन उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. या परिस्थितीला लक्षात घेऊन, कृषि विज्ञान केंद्राच्या (Krushi Vidnyan Kendra Nashik) यश मधमाशी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेले ‘मधुशीतगृह’ हे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान मधमाश्यांच्या संवर्धनासाठी वरदान ठरत आहे.

मधुशीतगृह’ – एक क्रांतिकारी कल्पना

सातेरी मधमाशांच्या वसाहतीसाठी उन्हापासून संरक्षण मिळावे आणि त्यांच्या मेहनतीत बचत व्हावी, यासाठी खास विटांचे घर बांधले आहे. या घराला पाणी शिंपडून थंड ठेवले जाते, ज्यामुळे मधमाशांच्या वसाहतीच्या आतमध्ये एक थंड आणि अनुकूल वातावरण तयार होते. ज्यामुळे मधमाश्यांना शिशुसंगोपण करणे सोप्पे होते.

‘मधुशीतगृह’ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य : 

‘मधुशीतगृह’ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य हे स्थानिक आणि सहज उपलब्ध होणारेआहे, जेणेकरू ग्रामीण भागात हे तंत्रज्ञान सहज वापरता येईल:

  • विटा : घर बांधण्यासाठी मुख्य साहित्य
  • पाणी शिंपडण्याचे तंत्र : उष्णतेपासून संरक्षणासाठी दररोज पाणी शिंपडण्याची सोय.
  • छतासाठी गवत/ लाकडाची फळी : ऊन आत येऊ नये यासाठी.
  • पाण्याची टाकी : पाणी साठवण्यासाठी.

 

मधुशीतगृहाचे फायदे

  • मधमाशांची उत्पादकता वाढवते : थंड वातावरणामुळे मधमाशांची अतिरिक्त मेहनत वाचते आणि त्यांची उत्पादकता वाढते.
  • पर्यावरणपूरक तंत्रज्ञान : हे तंत्रज्ञान नैसर्गिक साधनांचा उपयोग करते, ज्यामुळे पर्यावरणावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही.
  • कमी खर्चिक आणि सोपे : या घरासाठी लागणारे साहित्य स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे.
  • ग्रामीण भागासाठी आदर्श : स्थानिक संसाधने वापरून हे घर बांधता येते, ज्यामुळे ग्रामीण भागात मधमाशीपालन सुलभ होते. 
  • जैवविविधतेचे संरक्षण : मधमाशांची संख्या वाढवून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.

 

निष्कर्ष : ‘मधुशीतगृह’ हे केवळ एक पर्यावरणपूरक तंत्रज्ञान नाही, तर ग्रामीण भागातील मधमाशीपालन व्यवसायाला नवी दिशा देणारी संकल्पना आहे. ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्राच्या ‘यश मधमाशी विकास’ प्रकल्प अंतर्गत  हे तंत्रज्ञान प्रत्येक ग्रामीण भागात पोहोचवले जात आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीनाशिक