Lokmat Agro >स्मार्ट शेती > Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर 

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर 

Latest News How to check beneficiary status of Namo Shetkari Samman Yojana Know in detail | Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर 

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर 

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे बेनेफिशिअरी स्टेटस कसे पाहायचे हे या लेखातून समजून घेणार आहोत. 

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे बेनेफिशिअरी स्टेटस कसे पाहायचे हे या लेखातून समजून घेणार आहोत. 

शेअर :

Join us
Join usNext

Namo Shetkari Yojana : पीएम किसान सन्मान निधी बरोबरच शेतकऱ्यांना सहा रुपयांचे मानधन देणारी नमो शेतकरी महा सन्मान योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही लाभार्थी आहेत का? याचे बेनेफिशिअरी स्टेटस (Beneficiary Status) कसे पाहायचे हे या लेखातून समजून घेणार आहोत. 

बेनेफिशिअरी स्टेटस कसे पाहायचे?

  1. सर्वप्रथम https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे. 
  2. या ठिकाणी Beneficiary Status असा पर्याय दिसेल. हे स्टेटस पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबरने देखील पाहू शकता. 
  3. जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहिती नसेल किंवा विसरला असल्यास बाजूला Know Your Registration No या पर्यायावर क्लिक करा. 
  4. यात तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर किंवा आधार नंबर एंटर करू शकता. मोबाईल नंबर टाकल्यास आपल्याला ओटीपी पाठवला जाईल. 
  5. मोबाईलवर आलेला ओटीपी आणि वर दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा टाकायचा आहे. 
  6. यानंतर गेट डेटा या बटनावर क्लिक करायचं आहे. 
  7. गेट डेटावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला शेतकऱ्याचे नाव, त्याचा नोंदणी क्रमांक दाखवला जाईल. 
  8. शक्य झाल्यास नोंदणी क्रमांक लिहून ठेवायचा आहे. 
  9. यानंतर मुख्य मेनूवर येऊन आपल्याला मिळालेल्या नोंदणी क्रमांक (Registration No) किंवा मोबाईल नंबरने Beneficiary Status पाहू शकता. 
  10. आता पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकून ओटीपी मागवायचा आहे. ओटीपी आणि कॅप्चा कोड टाकून गेट डाटा पर्यायावर क्लिक करायचे आहे. 
  11. यानंतर लागलीच आपल्यासमोर शेतकऱ्याची सर्व माहिती उपलब्ध होईल. 
  12. जसे, नाव, पत्ता, यापूर्वीचे हफ्ते आलेले आहेत का? आले नसतील तर का आले नाहीत, याची माहिती आपल्याला दिसेल. 
     

Solar Pump Vendor : सोलर पंप योजना पुरवठादार किंवा वेंडरची यादी कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Latest News How to check beneficiary status of Namo Shetkari Samman Yojana Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.