Join us

Mug, Urad Pest : मूग आणि उडीद पिकांवरील किडींचा बंदोबस्त कसा कराल? जाणून घ्या सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 3:40 PM

Crop Management : मूग आणि उडीद पिकावर किडींचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. नेमक काय कराव?

Mug, Udid Crop : अनेक भागात मूग आणि उडदाची (Mug Cultivation) लागवड सुरू झाली असून अशातच अनेक किडींचा प्रादुर्भाव या पिकांवर होऊ लागला आहे. यामध्ये खोडमाशी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी, बिहार केस अळी, पाने खाणारी अळी, सोटअळी, मावा, फुले गुंडाळणारी अळी, शेंगा पोखरणाऱ्या किडी अशा किडींचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. अशावेळी पुढील उपाययोजना कराव्यात.

व्यवस्थापन : आजुबाजूच्या बांधावरील द्विदलवर्गीय तणांचा नाश करावा म्हणजे मुख्य पीक नसताना किडीच्या अवस्था यांचे जीवनचक्र नष्ट होईल. मुग उडीदाच्या चार ओळीनंतर एक ओळ ज्वारीची पेरणी करावी. जेणेकरून त्याचा पक्षीथांबे म्हणून उपयोग होईल. तसेच किंडीचा प्रसार होण्यास अटकाव होईल.प्रकाश सापळा : १ प्रकाश सापळा / हेक्टर रात्रीला शेतात लावावा. यामध्ये प्रकाशाकडे आकर्षित होणाऱ्या किडी जमा होतील, सकाळी त्यांची विल्हेवाट लावावी.

रासायनिक खतांचा वापर (मूग) 

शेंगा पोखरणारी अळीकीटकनाशक : मोनोक्रोटोफॉस 36.00 टक्के एसएल मात्रा : 8.5 मिली.

रासायनिक कीटकनाशकांचा वापर (उडीद)शेंगा पोखरणाऱ्या किडी - कीटकनाशक : क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५०% एससी २ मिली. किंवा  फ़्ल्युबेन्डामाईड ३९.३५ % एससी २ मिली. किंवा ल्युफेन्युरॉन ५.४० % ईसी १२ मिली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६.०० % एसएल  १२.५ मिली. किंवा थायोडीकार्ब ७५.०० % डब्ल्युपी १२.५-१५.० ग्रॅम. किंवा नोव्हाल्युरॉन ५.२५ % + इन्डोक्झाकार्ब ४.५ % एससी १६.५-१७.५ मिली. 

तंबाखुवरील पाने खाणारी अळी, फुले गुंडाळणारी अळीकीटकनाशक - फ़्ल्युबेन्डामाईड २०.०० % डब्ल्युजी ६ ग्रॅम. किंवा नोव्हाल्युरॉन ५.२५ % + इन्डोक्झाकार्ब ४.५ % एससी १६.५-१७.५ मिली. 

बिहार केसाळ अळीकीटकनाशक - क्विनलफॉस २५.०० % ईसी ३० मिली

महत्वाची सूचना : वरील प्रमाण साध्या पंपासाठी आहे, पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. (मात्रा / १० लि. पाणी)

साभार : डॉ. डी. के. पाटील, प्रमुख शास्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, बदनापूर 

टॅग्स :पीक व्यवस्थापनशेतीशेती क्षेत्रखतेशेतकरी