Lokmat Agro >स्मार्ट शेती > Crop Management : सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर 

Crop Management : सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर 

Latest News How to do integrated management of soybean crop? Know in detail  | Crop Management : सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर 

Crop Management : सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर 

Crop Management : सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे, याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ रुपेश खेडकर यांनी मार्गदर्शन केले.

Crop Management : सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे, याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ रुपेश खेडकर यांनी मार्गदर्शन केले.

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : सद्यस्थितीत सोयाबीन पिकाच्या (Soyabean Crop) लागवडीसाठी शेतकरी तयारी करत आहेत. सोयाबीनच्या बीजप्रक्रियेनंतरच लागवड करण्याचा सल्ला कृषीतज्ञ देत आहेत. अशातच सोयाबीन पिकाचे (Crop Management) एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ रुपेश खेडकर दिली आहे. कृषी विज्ञान केंद्र मालेगाव (KVK  Malegaon) तर्फे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२४-२५ अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

यावेळी तांत्रिक बाबी सांगताना ते म्हणाले की, सोयाबीन पिकात (Soyabean Cultivation) दोन ओळीचे अंतर ४५ सेंटिमीटर व दोन झाडातील अंतर १० सेंटीमीटर ठेवावे तसेच बीज प्रक्रिया करताना प्रथम थायरम ची बीज प्रक्रिया करावी व नंतर २५ ग्रॅम पीएसबी व २५ ग्रॅम रायझोबियम बियाण्यास हलक्या हाताने चोळावे. अति पावसाच्या ठिकाणी सरी-वरंब्यावर ४ फूट अंतरावर वरंबे पाडून एका वरंब्यावर दोन ओळी टोकण पद्धतीने लागवड करावी. तसेच फुले संगम या वाणाची दाट पेरणी टाळावी व टोकण पद्धतीने एकरी १५ किलो बियाणे व पेरण्यासाठी २२ किलो बियाणे वापरण्याचे सांगितले. 

उगवणी पासून ३० दिवसापर्यंत पाच टक्के निंबोळी अर्काच्या दोन फवारण्या घ्याव्या व एकात्मिक तण नियंत्रणासाठी कोळपणी व गरजेनुसार निंदणी करण्याचे सांगितले. रासायनिक तण नाशकका मध्ये उगवणपूर्व तणनाशक पेंडीमिथेलीन ३० टक्के १ लिटर प्रति एकर व उगवणपश्चात तन नाशक इमेजीथायपर १०% प्रवाही ३०० मिली प्रती एकर २००लिटर पाण्यात घेऊन फवारणी करण्याचे सूचविले. विजय शिंदे यांनी एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये शेवटच्या वखरणी च्या वेळेस शेणखत जमिनीत मिसळावे व पेरणीच्या वेळेस हेक्टरी ५०किलो नत्र, ७५ किलो स्फुरद व ३० किलो पालाशचा वापर करावा. दुय्यम अन्नद्रव्य मध्ये माती परीक्षण अहवालानुसार हेक्टरी २०-२५ किलो सल्फर चा वापर करावा, याबाबत अवगत केले. 


केव्हीकेमार्फत प्रशिक्षण कार्यक्रम
आज कृषी विज्ञान केंद्र मालेगाव तर्फे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२४-२५ अंतर्गत समूह आद्यरेषा पीक प्रात्यक्षिके सोयाबीन प्रकल्पअंतर्गत सोयाबीन पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयी प्रशिक्षण कार्यक्रम तसेच सोयाबीन बियाणे वाण फुले संगम, फुले किमया व इतर गरजेच्या निविष्ठांचे वितरण मौजे कारंभेळ(क) व करंभेळ(हा) तालुका कळवण येथे करण्यात आले. या प्रकल्पासाठी कळवण तालुक्यातील करंभेळ (क), करंभेळ (हा), शृंगारवाडी, शिवभांडणे, खडकवन, वरखेडा इ. गावांचा समावेश आहे. सुरुवातीला कारंभेळ(क) व करंभेळ(हा) गावातून एकूण ७५ शेतकरी निवडण्यात आले. 
 

Web Title: Latest News How to do integrated management of soybean crop? Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.