दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असून यामुळे शेती पिकांवर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. फळ पिकावर देखील वाढत्या तापमानामुळे परिणाम होऊ लागला आहे. डाळिंब पिकासाठी वाढत्या तापमानाचा परिणाम कमी करण्यासाठी काय उपाय कराल? हे समजून घेऊया. याबाबत मालेगाव कृषी विज्ञान केंद्रातील उद्यान विद्या विषय विशेषज्ञ पवन मधुकर चौधरी यांनी काही उपाय सुचवले आहेत.
तर सर्वप्रथम फळधारक झाडाच्या वयानुसार शिफारस केलेल्या शेणखताच्या मात्रेच्या ५० % (१५ ते २० कि.ग्रॅ./ झाड) शेणखत द्यावे. बाष्पीभवन थांबविण्यासाठी शक्यतो पाणी संध्याकाळी द्यावे. भरदुपारी पाणी देणे टाळावे. शक्यतो सेंद्रिय आच्छादनांचा (उसाचे पाचट, करडईचा भुसा, कोरडे गवत इ.) अवलंब करावा. उन्हाळी हंगामात पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीतून कमी अन्नद्रव्यांचा पुरवठा होत असल्यामुळे १९:१९:१९ या विद्राव्य खताची १० रॉली पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
झाडाच्या वाढीसाठी संप्रेरके एन.ए.ए. १० पी.पी.एम. ची फवारणी फुलगळ कमी करण्यासाठी करावी. दुष्काळामध्ये झाडाची क्षमता वाढविण्यासाठी सॅलिसिलीक अॅसिड हे ३०० पी.पी.एम. या प्रमाणे फवारावे. मॅग्नेशियम सल्फेट ६ यें/ली पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने फवारावे जेणेकरून प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुधारेल. नत्र युक्त खतांचा वापर शिफारस केलेल्या मात्रेच्या २५ % वाढवावा. थायोयुरिया। रॉली किंवा पोटॅशियम नायट्रेट हे २.५ सें/ली पाणी या प्रमाणात फवारणी केल्यास झाडामध्ये दुष्काळ सहन क्षमता वाढते.
या महिन्यात सनस्कॅल्ड कमी करण्यासाठी केओलीन ५% ची फवारणी करावी. आवश्यक असल्यास १५ दिवसांच्या अंतराने २.५% प्रमाणे एक किंवा दोन अतिरिक्त फवारण्या घ्याव्यात. ✓ पॉलीप्रोपिलीन नॉन वूव्हन पिक आच्छदनांचा वापर केल्यास फळांचा रंग, दाण्यांचा रंग, फळातील रसाचे प्रमाण, इ. मध्ये सुधारणा होते. पिक आच्छदने झाड निहाय किंवा ओळी निहाय करता येणे शक्य आहे. यामुळे वाढत्या तापमानाचे दुष्परिणाम टाळता येतील. सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे झाडाच्या खोडाला होणारी इजा टाळण्यासाठी जमिनीपासून १ ते २.५ फुट अंतरावर बोर्डो पेस्ट लावावी.
सूत्रकृमर्मीच्या नियंत्रणासाठी शेणखताबरोबर २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्लस व निंबोळी पेंड २ किलो प्रती झाड या प्रमाणात टाकावे. रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी तेल २० मिली १० लि. पाणी किंवा सायनट्रीनीलपोल ९ मिली १० लि. या प्रमाणात फवारणी करावी. उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो फवारणी सायंकाळी 5 नंतर करावी.
लेखक :
पवन मधुकर चौधरी उद्यान विद्या विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र मालेगाव